पुरोगामी महाराष्ट्रात स्त्री-पुरुष समानता काळाची गरज - डॉ.भाई बाबासाहेब देशमुख

कमलापूर येथे परंपरेला छेद देत वीरपत्नीला प्रदान केले सुवर्ण अलंकार
सांगोला (कटुसत्य वृत्त): 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त कमलापूर येथे वीर पत्नी मंगल अमित आदलिंगे सुवर्ण अलंकार कार्यक्रम प्रधान करण्यात आला. विशेष बाब म्हणजे ग्रामपंचायत कमलापूर यांच्या वतीनेही सत्कार करण्यात आला. कमलापूर गावातील आदलिंगेमळा देशसेवा बजावत असताना भारताचे सैनिक शहीद जवान अमित आदलिंगे हे दिनांक-07/10/2020 रोजी शहीद झाले.या कार्यक्रमासाठी युवा नेते डॉ. भाई बाबासाहेब देशमुख (प्रदेशाध्यक्ष- पुरोगामी युवक संघटना) यांनी कार्यक्रमाच्या स्थळी बोलताना सुरुवातीला शहीद जवान अमित आदलिंगे बद्दल शोक व्यक्त करत आज ही देशामध्ये पुरुषप्रधान संस्कृती आहे. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आले पाहिजे. केवळ पुढे येऊन चालणार नाही तर धाडस निर्माण केले पाहिजे. राजकारण समाजकारण अर्थकारण याशिवाय सायंटिस्ट तसेच देशाचे रक्षण करण्यासाठी आज अनेक स्त्रिया देशाच्या सीमारेषेवर लढत आहेत. हे खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे.आज संपूर्ण भारत देशाला व संपूर्ण महाराष्ट्राला स्त्री- पुरुष समानता ही काळाची गरज आहे. केवळ भाषण करून हे प्रश्न सुटणार नाहीत तर ते प्रत्यक्ष आचरणात आणले पाहिजे. सांगोला तालुका परंपरेने पुरोगामी तत्त्वाचा स्वीकार करणारा तालुका आहे. या तालुक्यामध्ये स्वर्गीय आबासाहेबांनी जी तत्वे, नीतीमूल्ये,निष्ठा, पुरोगामी विचारधारा घालून दिलेले आहे.त्याच तत्वावर पाऊल ठेवून आपण सर्वजण पुढे जाऊया. सौ. निकिता बाबासाहेब देशमुख (असिस्टंट-ग्रामीण रुग्णालय अकोला), यांनीही आपल्या मनोगत यामध्ये सांगोला तालुक्यामध्ये स्त्रियांच्या ज्या समस्या असतील त्या समस्या रात्रीचा दिवस करून सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे उद्गार काढले. सांगोला तालुक्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये स्त्रियांचे मोठे संघटन मजबूत करणार आहे.असे सौ.निकिता देशमुख मॅडम यांनी सांगितले. यावेळी सौ निकिताताई देशमुख मॅडम यांच्या हस्ते मंगल आदलिंगे यांना मंगळसूत्र,सौभाग्याचे लेनं, बांगड्या सर्व साहित्य मोठ्या उत्साहात प्रदान करण्यात आले.सांगोला नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा सांगोला अर्बन बँकेचे चेअरमन,सामाजिक चळवळीचे अग्रभागी असणारी नेतृत्व, ज्येष्ठ नेते,डॉ.प्रभाकर (नाना) माळी, यांनीही आपल्या मनोगतामध्ये शाहू, फुले, आंबेडकरांचे उदाहरण देत महाराष्ट्र हा पुरोगामीचा स्वीकार करणारे राज्य आहे.पुरोगामीत्व ही आज काळाची गरज आहे. असे आपल्या मनोगतामध्ये सांगितले. यावेळी बंडू आदलिंगे यांनी मनोगत व्यक्त केले. सी.ए-के.स.माळी,रत्नप्रभा माळी यांनीही सखोल असे मार्गदर्शन केले.कमलापूर गावच्या प्रथम नागरिक तथा सरपंच,सोलापूर जिल्हा महिला सरपंच संघाच्या उपाध्यक्षा सौ.कलावती बंडगर,युवा नेते बाबुराव (बी.आर)बंडगर, उपसरपंच देविदास ढोले,तंटामुक्तीचे उपाध्यक्ष सोमनाथ(अण्णा)अनुसे,ग्रामसेविका शुभांगी गवंड,अशोक आदलिंगे,ग्रामपंचायत सदस्य युवक नेते रावसाहेब अनुसे,मधुकर तंडे,युवा नेते राजूभाऊ गोडसे,माजी सरपंच तथा विद्यमान सदस्या लता गोडसे, रुक्मिणी आदंलिगे, नाथा देवळे, धर्मा टकले, रामचंद्र तंडे (गुरुजी) उत्तम आदलिंगे,साधू गोडसे,श्रीरंग गोडसे सर,श्रीपती आदलिंगे,सोमनाथ आदलिंगे,नवनाथ आदलिंगे, चंद्रकांत आदलिंगे यावेळी कमलापूर पंचक्रोशीतील सर्व महिला, तरुण मित्र, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन युवा नेते सोमनाथ आदलिंगे तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एन.डी.बंडगर यांनी केले.
No comments:
Post a Comment