हर घर तिरंगा हा उपक्रम देशाचा उत्सव, सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे - खासदार जय सिध्देश्वर स्वामी
.jpg)
.jpg)
.jpg)
खासदार श्री. स्वामी यांच्याकडून "हर घर तिरंगा घरघर तिरंगा हर दिलमे तिरंगा" ही नवीन घोषणा
सोलापूर, (कटुसत्य वृत्त):- आजादी का अमृत महोत्सवांतर्गत संपूर्ण देशासह जिल्ह्यात राबविण्यात येत असलेला हर घर तिरंगा हा उपक्रम कोणत्याही एका धर्माचा नसून संपूर्ण देशाचा उत्सव आहे. या उत्सवात सर्व नागरिकांनी अत्यंत उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांनी केले.
हुतात्मा मार्कडेय उद्यान अशोक चौक येथे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सोलापूर व जिल्हा ग्रंथालय संघ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जिल्हातील शासनमान्य ८५० सार्वजनीक ग्रंथालयाना मोफत " तिरंगा वितरण कार्यक्रम " प्रसंगी खासदार श्री स्वामी बोलत होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव, ग्रंथालय निरीक्षक प्रमोद पाटील, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील, मार्गदर्शक ग्रंथमित्र कुंडलीक मोरे, माजी अध्यक्ष जयंत आराध्ये, पांडूरंग सुरवसे, प्रा. भीमाशंकर बिराजदार, विजयकुमार पवार आदी सह अन्य मान्यवर उपस्थित होते.
खासदार श्री. स्वामी पुढे म्हणाले की, आजादी का अमृतमहोत्सव साजरा करत असताना आनंद होत आहे. हा कार्यक्रम संपूर्ण देशभरात साजरा होत असून हा कोणत्याही एका धर्माचा उत्सव नसून तो संपूर्ण देशाचा उत्सव आहे. या उत्सवात दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या घरावर भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकावून अत्यंत उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी श्री. स्वामी यांच्या संकल्पनेतून "हर घर तिरंगा घरघर तिरंगा हर दिलमे तिरंगा" ही नवीन घोषणा देण्यात आली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सोलापूर जिल्ह्याचे मोठे योगदान आहे. आजादी का अमृत महोत्सवातर्गत स्वातंत्र्य लढ्यातील सोलापूरच्या योगदानाविषयी ची माहिती तरुण पिढीला व्हावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यातील ग्रंथालयाचा प्रश्न तात्काळ मार्गी लागण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ही जिल्ह्यातील ग्रंथालयांना निधी मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
स्वातंत्र्याच्या अमृतमहत्सवानिमित्त प्रत्येकाच्या मनात देशप्रेमाची भावना वाढीस लागावी म्हणून दिनांक 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक ग्रंथालयाच्या इमारतीवर व संबंधित सदस्यांच्या घरावर तिरंगा फडकवण्यात यावा असे आवाहन जिल्हा ग्रंथालय आधिकारी जाधव यांनी केले. जिल्हा ग्रंथालय संघ येथे ई- ग्रंथालय व अभ्यासिके साठी निधी द्यावा, त्याप्रमाणेच ग्रंथालयाचे अनुदान किमान तिप्पट करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी गुलाबराव पाटील यांनी केली.
प्रारंभी खासदार शिवाचार्य जय सिद्धेश्वर स्वामी यांच्या हस्ते जिल्ह्यातील 11 ग्रंथालयांना प्रातिनिधीक स्वरूपात भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा झेंड्याचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास जिल्ह्यातील बहुसंख्य ग्रंथपाल व कर्मचारी उपस्थित होते. बाळासाहेब चट्टे येणे सूत्रसंचालन केले तर जयंत आराध्या यांनी आभार मानले या कार्यक्रमाच्या यशस्वितसाठी साठी ग्रंथापाल संगीता कुमठेकर, वृषाली हजारे, सारीका माडीकर व दत्ताकुमार पोलके आदीनी प्रयत्न केले.
No comments:
Post a Comment