स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित ग्रंथप्रदर्शनास विद्यार्थी व नागरिकांनी भेट द्यावी
.jpg)
.jpg)
.jpg)
सोलापूर, (कटुसत्य वृत्त):- आजादी का अमृत महोत्सवानिमित्त श्री. हिराचंद नेमचंद वाचनालयात भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या स्वातंत्र्यवीरांनी बलिदान केले, कारावास भोगला, त्याग केला, अशा स्वातंत्र्यवीरांची चरित्रे व स्वातंत्र्यलढ्यातील घडामोडींचा आढावा घेणा-या ग्रंथांच्या प्रदर्शन भरविण्यात आलेले आहे तरी या प्रदर्शनात सोलापूर शहरासह जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी व नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव व वाचनालयाचे सह अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळगावकर यांनी केले.
हे ग्रंथप्रदर्शन हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या सभागृहात विद्यार्थी व नागरिक यांच्यासाठी दिनांक 15 ऑगस्ट 2022 पर्यंत सकाळी 9 ते 11 व सायंकाळी 5 ते 8 या कालावधीत खुले असणार आहे. तरी सोलापूर शहरासह जिल्ह्यातील नागरिक व विद्यार्थ्यांनी या ग्रंथ प्रदर्शनास भेट द्यावी.
No comments:
Post a Comment