मोहोळ तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव व वारसदारांचा सन्मान सोहळा - डॉ.कौशिक गायकवाड यांची माहिती

हर घर तिरंगा अभियान राष्ट्र ध्वज प्रदान सोहळा
मोहोळ (कटुसत्य वृत्त): मोहोळ येथील श्री संदीपान दादा गायकवाड बहुउद्देशीय संस्था मोहोळ व मोहोळ नागरी सहकारी पतपुरवठा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमोहोत्सव निम्मित भारताच्या स्वतंत्र लढ्यात योगदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव व त्यांच्या वारसदारांचा सन्मान सोहळा व हरघर तिरंगा कार्यक्रमांतर्गत राष्ट्रध्वज प्रदान सोहळा गुरुवार दि.११ रोजी आयोजीत केला आहे.माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ.कौशिक गायकवाड यांनी माध्यमांना दिली
स्वातंत्र्यसेनानि संदीपान गायकवाड मंगल कार्यालय येथे संपन्न होणाऱ्या कार्यक्रम माजी आमदार राजन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या शुभहस्ते तर आ.यशवंत माने उपविभागीय अधिकारी गजानन गुरव ,जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे ,सहआयुक्त निंगप्पा पाटील, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, तहसीलदार प्रशांतबेडसे-पाटील,मुख्यधिकारी योगेश डोके, पोलीस निरीक्षक अशोक सायकर गटविकास अधिकारी आनंदकुमार मिरगेणे, उपअधीक्षक भूमिअभिलेख सुजाता माळी, सहाय्यक निबंधक विद्याधर माने, पुलचंद लिंबाळकर ,शैलेश गरड ,यशवंत गुंड ,डॉ.स्मिता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. असे ही गायकवाड यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment