खरीप हंगामासाठी चिंचोली तलाव भरण्याच्या आमदार शहाजीबापू पाटील यांनी अधिकऱ्यांना सूचना दिल्या

सांगोला (कटूसत्य वृत्त):- निरा देवधर विर भाटघर धरण भागात यंदा चांगला पाऊस झाला असल्याने निरा देवधर विर भाटघर धरण ओव्हरफ्लो झाले असून निरा उजवा कालव्याच्या शाखा क्र ५मधून सांगोला तालुक्यातील चिंचोली तलाव खरीप हंगामासाठी येत्या एक ते दोन दिवसात पाणी सोडून भरण्यात यावे अशा सूचना अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये आमदार शहाजीबापू पाटील यांच्याकडून देण्यात आल्या सांगोला तालुक्यामध्ये यंदा पावसाने दांडी दिल्याने सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांची पिके शेतीमध्ये पाण्या अभावी उभे आहेत याची दखल घेत तात्काळ निरा उजवा कालव्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक आमदार शहाजीबापू पाटील यांनी घेतली व चालू आवर्तनाचा आढावा घेत चिंचोली तलावा ही पाणी सोडुन भरण्यात यावे धरण ओवर फ्लो झाले असल्याने तलावा मध्ये सोडलेल्या पाण्याची पाणी पट्टी अकारली जाणार नसल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे चालू आवर्तना मधून निरा उजवा कालव्यामधून महिम व हलदहिवडी येथील तलवा पाण्याने भरले असल्याने तेथील शेतकऱ्यांना ही दिलासा मिळाला असल्याने शेतकऱ्यांच्या मध्ये समाधान व्यक्त होत आहे
या बैठकीसाठी निरा उजवा कालव्याचे कार्यकारी अभियंता श्री बोडके, उपविभागीय अभियंता श्री राजेंद्र ताटी, शाखा अभियंता श्री जाधव यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment