संभाजीराव शिंदे विद्यामंदिर संकुल, विडी घरकुल विभागाच्यावतीने शिक्षणमहर्षी


सोलापूर (कटुसत्य वृत्त): स्व. विष्णुपंत (तात्यासाहेब) कोठे यांच्या जयंतीनिमत्त, जिल्हास्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन माजी शिक्षणाधिकारी श्री विद्याधर जगताप साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी *प्राचार्य वासुदेव इप्पलपल्ली सर, मुख्याध्यापिका तनुजा मारपल्ली मॅडम, पर्यवेक्षक सतिश मल्लाव सर, विभाग प्रमुख प्रा.नवनाथ व्हटकर, प्रा. प्रशांत चाबुकस्वार यांची प्रमुख उपस्थिती होती. वक्तृत्व स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्यातून ९३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रथम क्रमांक ऋचा जोतीराम साळुंखे (सेवासदन ज्युनिअर कॉलेज), द्वितीय क्रमांक यश सतिश वाघमारे (गांधीनाथा रंगजी महाविद्यालय), तृतीय क्रमांक नमिता अनिल चड्डे (हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स), उत्तेजनार्थ १) शाहीर समीर शेख (शरदचंद्र पवार कनिष्ठ महाविद्यालय) २) समर्थ रमेश बंडगर (दयानंद कॉलेज) यांनी यश संपादन केले.
प्रा. डॉ. सतिश पन्हाळकर (दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालय), प्रा. माधुरी जाधव (चंडक जुनिअर कॉलेज), प्रा.भीमगोंडा पाटील (हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स ), प्रा. श्रीधर सगेल (जागृती विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ),प्रा. सिद्धाराम पुजारी (गणेश रामचंद्र चितळे महाविद्यालय),प्रा. विजयसिंग ठाकूर (अण्णासाहेब पाटील ज्युनिअर कॉलेज), श्री विठ्ठल भोई (संभाजीराव शिंदे प्रशाला), सौ उषा मूळमाने (संभाजीराव शिंदे प्रशाला) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. नवनाथ व्हटकर यांनी केले तर आभार प्राचार्य वासुदेव इप्पलपल्ली सर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन *प्रा. जीवन यादव यांनी केले.
No comments:
Post a Comment