आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान व वृक्षारोपण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 1, 2022

आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान व वृक्षारोपण

आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान व वृक्षारोपण


२५५ जणांचे रक्तदान व ५५५ वृक्षांचे वृक्षारोपण

                    कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- विठ्ठल काॅर्पोरेशन चे संस्थापक चेअरमन तथा करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा विठ्ठलराव शिंदे यांच्या ५४ व्या वाढदिवसा निमित्त ३१ जुलै  रोजी विठ्ठल काॅर्पोरेशन लिमिटेड म्हैसगाव येथे रक्तदान व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.२५५ रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला.प्रारंभी कार्यकारी संचालक यशवंत भैय्या शिंदे यांच्या हस्ते टेक्सटाइल येथे ५५५ वृक्षांचे वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

                    यावेळी कार्यकारी संचालक यशवंत शिंदे,संचालक विजयकुमार पाटील, कार्यकारी सल्लागार विजयकुमार गिलडा,टेक्सस्टाईल विभागाचे जनरल मॅनेजर सुधीर अंबे,चीप इंजिनिअर मोहन पाटील,चीफ केमिस्ट प्रदीप केदार,मुख्य वित्तीय अधिकारी भास्कर गव्हाणे,डिस्टीलरी मॅनेजर अनिल शेळके,मुख्य शेती अधिकारी महेश चंदनकर, शेती अधिकारी नामदेव रणपिसे,पर्यावरण अधिकारी मनोज बोहरा,परचेस अधिकारी कल्याण पाटील,प्रशासकीय अधिकारी प्रदीपकुमार पाटील,सुहास वेदपाठक,एच.आर.मॅनेजर परमेश्वर माळी,सुरक्षा अधिकारी सचिन शिंदे  यांच्यासह विठ्ठल काॅर्पोरेशन मधील विविध विभागातील कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages