धनगर समाज सेवा महिला मंडळाच्या नूतन पदाधिकार्‍यांचा व दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 22, 2022

धनगर समाज सेवा महिला मंडळाच्या नूतन पदाधिकार्‍यांचा व दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

धनगर समाज सेवा महिला मंडळाच्या नूतन पदाधिकार्‍यांचा व दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

              सांगोला (कटूसत्य वृत्त):- धनगर समाज सेवा महिला मंडळाच्या नूतन पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली असून अध्यक्ष पदी  रूपाली मदने, उपाध्यक्ष पदी  मिनाक्षी गडदे, सल्लागार पदी अ‍ॅड.  संजिवनी लवटे यांची निवड झाली आहे. त्याबद्दल धनगर समाज सेवा महिला मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचाही यावेळी ट्रॉफी, पुष्पगुच्छ, नारळ व पेन देवून सत्कार करण्यात आला. यामध्ये साक्षी अमर तोडकरी- 96.20%, सोनाली अर्जुन खांडेकर- 92.60%, रूद्र सोमनाथ लोकरे- 90.80%, तेजश्री दत्तू काकडे- 90%, स्वराली संभाजी हजारे- 87.60%, स्वप्नाली यशवंत बंडगर- 88.40%, हर्ष अर्जुन शेळके (बारावी)- 87%, ओंकार धुळा सरक- 84.20%, मंगेश महादेव लोहकरे- 80.40%, दिक्षा अजय खरात- 85%, आदर्श मोटे (बारावी)- 81%, गौरी दत्तात्रय ढोले- 98.20% तालुक्यात प्रथम, सिध्दी रामचंद्र कटरे- 88.20%, अंकिता अरूण यलमार- 90.67% या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

              तसेच तुषार ढेरे याने सीए (चार्टर्ड अकौंटंट)ची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा सुध्दा धनगर समाज सेवा महिला मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

              यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून घेरडी गावच्या सरपंच सौ. सुरेखाताई पुकळे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  आशाताई सलगर मॅडम होत्या. त्याठिकाणी  सुरेखाताई पुकळे, आशाताई सलगर,  रूपाली मदने,  मिनाक्षी येडगे यांनी तसेच दत्तात्रय ढोले सर व काही पालक आणि विद्यार्थ्यांनी सुध्दा त्यांचे मनोगत व्यक्त केले.

              कार्यक्रमासाठी सांगोला नगरपरिषदेच्या  लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने,  नगरसेविका सौ. छायाताई मेटकरी, मंडळाच्या अध्यक्षा  रूपाली मदने, उपाध्यक्षा  मिनाक्षी गडदे, सल्लागार अ‍ॅड.  संजिवनी लवटे,  दिपाली सरगर, शांता हाके,  अनिता जानकर,  ज्योती चोरमुले,  साक्षी गाडेकर,  वैशाली गाडवे,  स्वाती साठे,  प्रियांका श्रीराम,  छाया शिंगाडे, . अश्विनी पुजारी,  ताई ढेरे,  रेश्मा गावडे,  सुनिता मेटकरी, सौ. कल्पना माने, सौ. कोमल लोकरे,  कौशल्या गावडे, सौ. सावित्री सरक, विद्या माने, शिला माने,  वंदना गाडेकर,  स्नेहल कटरे, शोभा गाडेकर,  सुनिता आलदर आदी महिला व मुरलीधर इमडे सर, विनायक पांढरे, दत्तात्रय ढोले, स्नेहा कटरे, सुनिता मेटकरी, अरूण यलमार आदी पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक  अश्विनी पुजारी यांनी केले तर सूत्रसंचालन सुवर्णा गाडेकर यांनी केले. तसेच तनुजा गाडेकर व ॠतुजा गाडेकर यांनी स्वागत गीत गायले. तर उपस्थितांचे आभार सौ. राणीताई माने यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages