पर्यावरण पूरक व नैसर्गिक रंगाच्या देवमूर्ती तयार करून बाजारात विक्री करावी मोहोळ नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ.योगेश डोके यांचे आवाहन

मोहोळ (कटुसत्य वृत):- देवमूर्ती पर्यावरण पूरक व पारंपारिक पद्धतीने नैसर्गिक रंगाच्या मूर्ती मातीचा वापर करुन मार्केटमध्ये विक्री करण्यात यावेत असे आवाहन मोहोळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.योगेश डोके यांनी प्रसिद्धी पत्रकांन्वये केले आहे.
लोक पर्यावरणाचा विचार करत नाहीये मीच का काळजी घेऊ असे म्हणून सगळे जण हा विषय टाळत आहेत पण जर प्रत्येकाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला तर थोड्या प्रमाणात का होईना आपण प्रदूषण टाळू शकतो प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती नदीपात्रात विसर्जन करून पाणी प्रदूषित करण्यापेक्षा शाडूच्या मूर्तीचे पूजन करून कृत्रीम तलावात विसर्जन करणे ही काळाची गरज आहे. पारंपारिक मातीच्या मूर्ती ऐवजी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचा वापर, तसेच सजावटीसाठी थर्माकोलचा वापर, घातक रासायनिक रंगांचा वापर करण्यात येतो यामुळे जलप्रदूषण होऊन मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होत आहे याकरिता मोहोळ नगरपरिषदेने तयार केलेल्या कृत्रिम हौदामध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात यावे व ही हानी टाळण्याकरता माझी वसुंधरा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मूर्ती निर्माते यांना पर्यावरण पूरक मूर्ती बनविणे आणि विक्री करणे यासाठी आवाहन करण्यात येत आहे.
पर्यावरण पूरक गणेश मुर्त्या बनवून पर्यावरण पूरक आकर्षक सजावट सादर करणाऱ्या मंडळ, संस्था व वैयक्तिक या करिता मोहोळ नगरपरिषदेच्या स्पर्धचे आयोजन केले आहे प्रथम द्वितीय तृतीय व आकर्षक सजावट गौरव पत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment