शेकाप संपला म्हणणाऱ्यांना शेकाप कसा उभा राहिला आहे, ते दाखवून देवू : भाई जयंत पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 2, 2022

शेकाप संपला म्हणणाऱ्यांना शेकाप कसा उभा राहिला आहे, ते दाखवून देवू : भाई जयंत पाटील

शेकाप संपला म्हणणाऱ्यांना शेकाप कसा उभा राहिला आहे, ते दाखवून देवू : भाई जयंत पाटील

                    सांगोला (कटुसत्य वृत्त):- शेकापक्ष संपला संपला म्हणणार्‍याला शेकापक्ष कसा उभा राहतोय ते दाखवू असे सांगत ज्यांनी गद्दारी, बेईमानी आणि फसवणूकचे वर्तन केले आहे. त्याचा बदला घेतल्याशिवाय शेकाप राहणार नाही. विधीमंडळात प्रभावी अभ्यासपूर्ण काम केले तर काय होऊ शकते हे आपण आबासाहेबांच्या रुपाने सांगोला तालुक्यासारख्या दुष्काळी भागात पाहिले आहे. सांगोला तालुुक्यात नंदनवन करण्याचे काम आबासाहेबांनी केले. सांगोलेकरांची मानहानी थांबली पाहिजे असे सांगत घोडेबाजार आम्हाला माहित नाही, खिलाराचा बाजार माहित आहे. अशी टीका करत परिपुर्ण आता आपल्या सर्वांना विचार करण्याची वेळ आली आहे. शेकापक्षाकडे निष्ठेने पाहणार्‍या सांगोला तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मला अभिमान आहे,असे सांगत आबासाहेबांनी दिलेली प्रेरणा स्फुर्ती मी कधीही आयुष्यात विसरणार नसल्याचे शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी सांगितले.

                    सांगोला सूतगिरणी येथे स्व.भाई.गणपतराव देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त  शनिवार दि.30 जुलै रोजी भजन, पुष्पवृष्टी कार्यक्रम व शेतकरी मेळावा आयोजीत केला होता. शेतकरी मेळाव्याप्रसंगी भाई.जयंत पाटील बोलत होते. व्यासपीठावर शेकापक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

                    पुढे बोलताना आ.भाई जयंत पाटील म्हणाले, विधीमंडळाचे बजेट हे आमदारांसाठी नसते तर जनतेसाठी असते. हे कोण मंत्री देत नाही तर सभागृह देते.सभागृहामध्ये व्यवस्थित मांडता आले तर मतदारसंघात कधीही पैसे कमी पडत नाही. सांगोल्याचा राजकारणात काही आमदार आज बोलतात. आमदार म्हणून मला बोलायला लाज वाटते. असे सांगत हे पैसे सभागृह देत असते. मंत्री किंवा बाकी कोण देत नसतात. हे मिळविण्याची हिंमत, धमक आणि आवाका ज्या आमदारांमध्ये असतो. त्या त्या मतदारांसंघामध्ये निधी मिळू शकतो. ते आम्ही मिळविला असून तोआबासाहेबांनी मिळविला असून आबासाहेबांनी सभागृहाच्या कामकाजातून मोठ्या प्रमाणात निधी आणला.  

                    आम्ही कधी टीआरपी बघीतली नाही, आम्ही कधी पत्रकार बघितले नाहीत, आम्ही कधी मिडीया बघीतली नाही. आमची मिडीया जनतेच्या हृदयात आहे असे सांगत आज आपण कुठे चाललो आहे. काही जण झाडी बघत आहेत तर काही जण डोंगर बघत, ज्यांना डोंगर बघायचे आहेत त्यांनी अलिबागला या भरपूर डोंगर आहेत असे सांगत ही मतदारांची चेष्टा आहे. मतदारांची चेष्टा करुन त्यांच्या मतांची किमंत केली जात असल्याची खंतही भाई जयंत पाटील यांनी यावेळी बोलून दाखविली.  

                    मंत्रीपद, सत्ता नसताना केवळ विधीमंडळातील अभ्यासपूर्ण कामगिरीवर जोरावर, पंढरपूरहून आबासाहेबांनी सांगोल्याला पाणी आणले. मागेल त्याला काम या योजनेची अंमलबजावणी आबासाहेबांमुळे झाली असून सायकल घेण्याची कुवत नसणार्‍या तालुक्यात आज मसिर्डीज घेवून फिरतात हे केवळ आबासांहेबामुळे झाले आहे. टेंभू म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी आबासाहेबांनी पाठपुरावा केला त्यामुळे योजना पुर्णत्वास आली आहे. खा.नितीन गडकरी साहेबांनी योजनेसाठी भरपूर  निधी दिला असल्यामुळे योजना पुर्णत्वाकडे गेली असे सांगत निधीसाठी पक्ष बदलण्याची गरज नसते असे सांगितले. सांगोल्यामध्ये कधी घोड्याचा बाजार नव्हता तो घोड्याचा बाजार आता सुरु झाला आहे. सांगोलेकरांची मान शरमेनी खाली गेली आहे. सध्या जो घोडेबाजार चालू आहे याच दुख मला होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

                    शेतकरी मेळाव्यास तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी, पुरोगामी युवक संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages