'गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो गुहावाटी' विरोधकांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणला

मुंबई (कटूसत्य वृत्त):- '50 खोके...एकदम ओक्के...' अशी घोषणाबाजी करून विरोधकांनी पावसाळी अधिवेशचा पहिला दिवस गाजवला.आज दुसऱ्या दिवशी 'गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो गुहावाटी' अशी घोषणाबाजी करून शिंदे गटाच्या आमदारांवर जोरदार हल्लाबोल चढवला. त्यामुळे शिंदे गटांच्या आमदारांना काही बोलायला जागा उरली नाही. पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस विरोधकांनी घोषणाबाजीने गाजवला. विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांनी एकत्र येतत जोरदार घोषणाबाजी केली.
50 खोके...एकदम ओक्के, ईडी सरकार हाय हाय अशी घोषणा देणे सुरू केले. जेव्हा शिंदे गटाचे आमदार विधानभवनात जात होते, त्यावेळी विरोधकांच्या घोषणाबाजीला आणखी जोर वाढला. शिवसेनेच्या बंडखोर आमदार यामिनी जाधव जाताना विरोधकांनी 50 खोके एकदम..ओक्के...ईडी ईडी अशा घोषणा दिल्या. या घोषणाबाजीमुळे यामिनी जाधव काही न बोलता पुढे निघून गेल्या.
त्यानंतर ईडीच्या कारवाईमुळे बेजार झालेले आमदार प्रताप सरनाईक आले. त्यावेळी आले आले गद्दार आले, 'गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो गुहावाटी' अशा घोषणा देऊन एकच हल्लाबोल केला. त्यामुळे सरनाईक यांनाही उलट घोषणा देऊन विधानभवनात जाणे पसंत केले.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी एकत्र जमून शिंदे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी '50 खोके...एकदम ओके, ईडी सरकार हाय हाय' अशा घोषणा दिल्यात. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उत्पादन मंत्री शंभूराजे देसाई हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी चालले होते. त्यामुळे विरोधकांनी '50 खोके एकदम ओके' जोरजोरात घोषणाबाजी सुरू केली. यावेळी शंभू राजे देसाई यांनीही 'पाहिजे का?' असं म्हणून विरोधकांना उत्तर दिलं.
No comments:
Post a Comment