राज्यात झालेला सत्ता बदल आ. समाधान आवताडे यांच्यासाठी ठरला फायदेशीर, पुरवणी मागण्यात मिळाले मतदार संघासठी 75 कोटी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 18, 2022

राज्यात झालेला सत्ता बदल आ. समाधान आवताडे यांच्यासाठी ठरला फायदेशीर, पुरवणी मागण्यात मिळाले मतदार संघासठी 75 कोटी

राज्यात झालेला सत्ता बदल आ. समाधान आवताडे यांच्यासाठी ठरला फायदेशीर, पुरवणी मागण्यात मिळाले मतदार संघासठी 75 कोटी

               मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):- राज्यात झालेला सत्ता बदल आ. समाधान आवताडे यांच्यासाठी फायदेशीर ठरला असून महिन्याभरात जवळपास 75 कोटींच्या विकास कामाला मंजुरी मिळवण्यात आ. समाधान आवताडे यशस्वी ठरले आहेत.

               आ. समाधान आवताडे यांनी गाव भेट दौरा केला होता या दौऱ्यामध्ये वीज, पाण्याबरोबर सर्वाधिक तक्रारी ह्या रस्ता दुरुस्तीच्या संदर्भात होत्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, वाहतुकीसाठी मोठी गैरसोय होत असल्याच्या अनुषंगाने पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये निधीची तरतूद करावी. अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्याकडे आवताडे यांनी केली होती. या मागणीला यश मिळाले असून तालुक्यातील रस्ते कामासाठी 50 कोटी 5 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. येत्या काही दिवसात या रस्त्याची कामे सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

               सदर निधीतून पुढील रस्त्याची कामे होणार आहेत त्यामध्ये, पाटखळ - नंदेश्वर - भोसे - हुन्नूर ते राज्य हद्द रा. मा. 391 कि. मी. 6.100 ते 65 रस्त्यांची सुधारणा करणे, 3.5 कोटी, मांजरी - लक्ष्मी दहिवडी - आंधळगाव -पाटखळ -भाळवणी - तळसंगी प्रजिमा. रस्ता 74 कि. मी. 3.800 ते 12.600 सुधारणा 7.5 कोटी, महमदाबाद -लोणार - पडोळकरवाडी जिल्हाहद्द प्रजिमा 162 कि. मी. 6 ते 11.600 रस्ता सुधारणा 3.80 कोटी, पाटखळ - नंदेश्वर -भोसे - रेवेवाडी रस्ता रा.मा. 391 कि. मी. 65 ते 75 रस्ता सुधारणा 7.5 कोटी, मंगळवेढा -डोंगरगाव - शिरनांदगी - हाजापूर रस्ता प्रजिमा 160 कि. मी. 0 ते 10 रस्ता सुधारणा 5 कोटी, धर्मगाव -ढवळस - मल्लेवाडी - घरनिकी - मारापुर गुंजेगाव -लक्ष्मी दहिवडी -मेडशिंगी ते जवळा रस्ता प्रजिमा 76 कि. मी. 18.400 ते 25 रस्ता सुधारणा 3.5 कोटी, मंगळवेढा -खोमनाळ - भाळवणी - निंबोणी - सलगर बु प्रजिमा 73 कि. मी. 6.600 ते 10.600 रस्ता सुधारणा 3 कोटी, मंद्रूप - निंबर्गी - भंडारकवठे - कर्जाळ - हुलजंती - पौट - मरीआई चौक निंबोणी - नंदेश्वर -गोणेवाडी - लेंडवेचिंचाळे ते प्ररामा 6 ला मिळणारा रस्ता प्रजिमा 60 कि. मी. 28 ते 39 रस्ता सुधारणा 9 कोटी, दिघंची जिल्हा सरहद्द खवासपुर - लवटेवाडी - सोनलवाडी - वाणीचिंचाळे - भोसे रा. मा. 386 कि. मी. 52.750 ते 57.400 व घेरडी -हुन्नूर - मारोळी - सलगर बु रा.मा. 389 साठी 7.5 कोटी असा निधी मंजूर झाला आहे. 50-54 च्या शीर्षकाखाली जर रस्त्याची दर्जोन्नती झाली नसेल तर हे काम सदर शीर्षकाखाली घेता येत नाही याकरिता रस्त्यांची दर्जोन्नती होणे आवश्यक असते,पण मागील अनेक वर्षांपासून सदरचा दर्जोन्नतीचा प्रस्ताव प्रलंबित आहे. पंढरपूर तालुक्यात रस्त्यांच्या दर्जोन्नती नसल्यामुळे एक ही काम घेता न आल्याची खंत असून उपमुख्यमंत्र्यांना दर्जोन्नतीसाठी विनंती केली असे आमदार समाधान आवताडे यानी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages