J4E संस्थेकडून राहुल तावसकर यांना सामाजिक पुरस्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 21, 2022

J4E संस्थेकडून राहुल तावसकर यांना सामाजिक पुरस्कार

 J4E संस्थेकडून राहुल तावसकर यांना सामाजिक पुरस्कार

                मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मुकुंद नगर 3 D हॉटेल येथे  J4E संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात कार्य करण्याऱ्या व्यक्तींचा सत्कार समारंभ कार्यक्रम पार पडला.यावर्षीचा आदर्श समाजसेवक पुरस्कार समाजातील निस्वार्थ काम केलेबद्दल सामाजिक कार्यकर्ते राहुल तावसकर यांना देण्यात आला.यावेळी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सिने अभिनेते मिलिंद गुणाजी ,आनंद देशपांडे ,उषा काकडे ,विशाल मिथे,रत्नावली इंगोले यांचे हस्ते देण्यात आला.

                सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील रहिवाशी असलेले राहुल तावसकर यांनी श्रमदानातून पिसेची विहीर स्वछ केली.काममध्ये नियमितता असेल व मनात जिद्द असेल तर कोणतेही काम अशक्य नसते हि गोष्ट सामाजिक कार्यातून राहुल तावसकर यांनी करून दाखवली आहे. संपूर्ण परिसरातील नागरिकांना पाण्याची कायम स्वरूपी सोय केली. या श्रमदानातून केलेल्या कामाची दाखल  J4E संस्थेकडून घेण्यात आली.आणि राहुल तावसकर यांना आदर्श समाजसेवक हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी शरद शिंगाडे ,अमोल महामुनी ,सूर्यकांत मोटे, गणेश गुरव, संजय गवळी, बाळासाहेब पतंगे, अमोल कुंभार, अमोगसिद्ध शेळके, गंगाराम म्हमाणे, आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages