महूद बु येथे सुरू असलेल्या गटारीचे (साईट ट्रेड) निकृष्ट दर्जाचे काम

तात्काळ थांबवून संबंधितावर कार्यवाही करावी - अभिषेक कांबळे
भ्रष्टाचारी अधिकारी मात्र मूग गिळून गप्प
सांगोला (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर कराड रोडवरील महुद बुद्रुक तालुका सांगोला येथे सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत सुरू असलेल्या रोड लगतच्या गटारीचे (साईड ड्रेन)काम अंदाज पत्रकानुसार होत नसल्याचे दिसून येत आहे.या कामांमध्ये वापरले जाणारे साहित्यामध्ये वाळू, सिमेंट, लोखंडी सळई, खडी यांचे प्रमाण अंदाजपत्रकामध्ये दिलेल्या प्रमाणानुसार नाही, सदर कामामध्ये ओढ्यातील माती मिश्रित वाळूचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.हे सर्व होत असताना ठेकेदारांची मर्जी सांभाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र मूग गिळून गप्प असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सार्वजनिक विभागाच्या सूचनेनुसार रोडच्या मध्यापासून नऊ मीटर अंतरावर गटार होणे अपेक्षित आहे, परंतु रस्त्याच्या प्रमाणात काही ठिकाणी अंतर कमी जास्त करण्यात आले असल्याने गटार नागमोडी (जिक जॅक) पद्धतीने झाल्याचे दिसून येत आहे.यासंदर्भात पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे ज्युनिअर इंजिनिअर श्री घाडगे यांच्याशी फोनवर वारंवार संपर्क करून तक्रार केली व कार्यकारी अभियंता श्री गावडे साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे कार्यवाहीची मागणी केली असता, संबधित अधिकाऱ्यांनी माञ आर्थिक मलिदाच्या आशेने ठेकेदाराला कोणत्याही सूचना व त्याच्यावर कार्यवाही केली नसल्याचे दिसून येत नाही.
गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या गटाचे काम उत्कृष्ट दर्जाचे होण्यासाठी सध्या सुरू असलेले निकृष्ट दर्जाचे काम तात्काळ थांबवून संबंधित ठेकेदारावर कारवाही करावी, अशी निवेदनाद्वारे मागणी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांच्याकडे केली आहे. सदर काम अंदाज पत्रकानुसर नाही केले तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक कांबळे यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment