महाड येथे रायगड पोलीस दलाचे आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष स्थापन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 7, 2022

महाड येथे रायगड पोलीस दलाचे आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष स्थापन

महाड येथे रायगड पोलीस दलाचे आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष स्थापन

             बोरघर / माणगाव (कटुसत्य वृत्त): पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग यांच्या अधिपत्याखाली नेमण्यात आलेले महाड येथील पुर व दरडग्रस्त आपत्ती व्यवस्थापनाकरीता रायगड पोलीस दलाचे स्वतंत्र “आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष " कम्युनिटी हॉल, नवीन पोलीस वसाहत नवेनगर तालुका महाड येथे दिनांक ०७.०६.२०२२ रोजी स्थापन करण्यात आलेले आहे.   

             सदर ठिकाणी श्री. अशोक दुधे, पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग व श्री. अतुल झेंडे, अपर पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग, मा. श्री. निलेश तांबे, सहा. पोलीस अधीक्षक महाड विभाग महाड, यांनी दि. ०५.०७.२०२२ रोजी व ०६.०७.२०२२ रोजी “आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष " महाड येथे भेट देवुन रायगड जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पाऊस व रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापना कडुन हाय अलर्ट जारी असल्याने आपत्ती नियंत्रण कक्षातील राखीव टिम, महाड व पोलादपुर विभागातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची एकत्रित बैठक घेवून त्यांना पुरविण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन साहित्यासह युद्धपातळीवर आपआपले कर्तव्यावर सतर्क राहण्याबाबत सुचना दिल्या.     

             तसेच सदर मिटिंग दरम्यान आपत्ती व्यवस्थापनाकरीता नेमण्यात आलेल्या अधिकारी / अमलदार यांना अत्यावश्यक साधनसामुग्री ( रेनकोट, गमबुट, रिंगबोया, लाईफ जकेट ) यांचे वाटप केले. तसेच श्री. अमोल यादव, अतिरिक्त जिल्हाधिकारी, रायगड अलिबाग, प्रांताधिकारी, महाड श्रीमती प्रतिमा पुदलवाड तसेच तहसिलदार महाड श्री. सुरेश काशिद यांनी आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट देवुन मार्गदर्शन केले. दिनांक ०६.०७.२०२२ रोजी मा. आमदार श्री. भरत गोगावले, विद्यमान आमदार महाड-माणगाव-पोलादपुर मतदार संघ यांनी नियंत्रण कक्षाला भेट देवुन पाहणी केली व रेस्कु संदर्भात साहित्य पुरविणार असल्याबाबतचे आश्वासन देण्यात दिले आहे.

             सदर “आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष " कम्युनिटी हॉल, नवीन पोलीस वसाहत नवेनगर ता. महाड येथे कार्यरत असुन पोलीस आपत्ती नियोजनाकरीता ०३ टिम तयार करण्यात आलेल्या असुन प्रत्येक टिममध्ये ०३ अधिकारी ०८ पोलीस अंमलदार तसेच ०५ पोलीस बोटमन व ०५ पोलीस अंमलदार बोट चालविण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच १ पाच टनी वाहन, ०२ पीसीआर वाहन, ०८ मोटार सायकल असे सर्व अत्यावशक साहित्यांसह सज्ज आहे. तसेच महाड उपविभागामध्ये १४ सेक्टर व पोलादपुर विभागामध्ये ५ सेक्टर तयार करण्यात आलेले आहेत. प्रत्येक सेक्टरमध्ये दिवसरात्रो अशा पद्धतीने ०२ प्रशिक्षीत पोलीस अमलदार वॉकीटॉकी सह सतर्क ठेवण्यात आलेले आहेत. माहे जुलै २०२१ ची पूरस्थिती पाहता सन २०२२ करीता रायगड पोलीस दल व महाड विभाग पूरस्थिती व दरडग्रस्थ परिस्थिती मध्ये आपत्ती नियोजन साहित्यासह सज्ज व सतर्क आहे. तसेच महाड व पोलादपूर तालुक्यातील नागरिकांना आपत्ती जन्य परिस्थितीत पुढील दूरध्वनी व मोबाईल क्रमांकावर  तात्काळ संपर्क साधण्या बाबत आवाहन करण्यात आले आहे. आपत्ती नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक ०२१४५- २२४६०० मोबाईल क्रमांक ९७३००९२११४ जनसंपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक रायगड यांचे कार्यालय 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages