मोहोळ ढोकबाभूळगांव निकृष्ठ रस्त्याची चौकशी करून पंधरा दिवसात दुरुस्त करण्याची केली मागणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 22, 2022

मोहोळ ढोकबाभूळगांव निकृष्ठ रस्त्याची चौकशी करून पंधरा दिवसात दुरुस्त करण्याची केली मागणी

मोहोळ ढोकबाभूळगांव निकृष्ठ रस्त्याची चौकशी करून पंधरा दिवसात दुरुस्त करण्याची केली मागणी



                  मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ ते ढोकबाभूळगांव हा रस्ता नगरपरिषदेने केला असून अवघ्या काही दिवसातच तो रस्ता खराब झाला आहे. या रस्त्याचे काम नगरपरिषदेचे अधिकारी व ठेकेदार यांनी संगनमत करून निकृष्ठ दर्जाचे केले आहे. तसेच या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. या कामाची मुख्याधिकारी यांनी स्वतः सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी व पुढील १५ दिवसात तो खराब रस्ता दुरुस्त करावा अन्यथा येथील नागरिकांसह तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदन प्रशांत गाढवे यांच्या नेतृत्वाखाली दिले आहे.

                  या बाबत सविस्तर वृत्त असे की , नगरपरिषदे मार्फत मोहोळ ते ढोकबाभुळगांव जाणारा रस्ता अधिकारी व ठेकेदार यांनी संगनमत करून  निकृष्ठ दर्जाचा केलेला आहे. या कामात मोठा  भ्रष्टाचार झालेला आहे . त्या रस्त्याचे काम संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी संगनमत करून तो  रस्ता अतिशय निकृष्ठ दर्जाचा केल्यामुळे एकाच महिन्यामध्ये संपूर्ण रस्त्यावर खड्डे  पडले आहेत . तर  त्या रस्त्यावरील  डांबरीकरण पूर्णपणे निघून गेलेले आहे. या रस्त्यालगत अतिशय दाट अशी लोकवस्ती आहे . त्याठिकाणी अनेक कुटुंबे  राहतात त्यांच्या मुलांना शाळेत ये-जा करण्यासाठी तसेच या परिसरातील शेतकऱ्यांचा शेतीमाल वस्तीवरून मोहोळच्या बाजारपेठेत  ने - आण करण्यासाठी अत्यंत अडचणी निर्माण होत आहेत. त्याचबरोबर  वयोवृध्दांना आणि गरोदर महिला रुग्णांना  प्रसूतीसाठी दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी व परत घरी घेऊन जाण्यासाठी अत्यंत अडचणी निर्माण  होत आहेत . त्यामुळे या परिसरातील  नागरिकांना नाहक मनस्ताप व प्रचंड त्रास होत आहे.  संबंधित नागरिक नगरपरिषद प्रशासनाला त्यांच्या मालमत्ता कर भरुन सुध्दा त्यांना त्रास सहन करुन घेणे हे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे.

                  त्यामुळे मुख्याधिकारी यांनी  स्वतः सदर रस्त्याची पाहणी करावी व जो  अधिकारी जो  ठेकेदार ज्यांनी हा  रस्ता बनविताना जो भ्रष्टाचार केला आहे. त्याची  सखोल चौकशी करुन त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी हा रस्ता पुढील १५ दिवसात दुरुस्त न झाल्यास व ठेकेदार व अधिकारी यांचेवर कारवाई न झाल्यास या परिसरातील सर्व नागरिक लोकशाहीच्या मार्गाने  तीव्र स्वरुपाचे आंदोलन करतील असा इशारा ही तहसीलदार , मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आलेल्या  निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी प्रशांत गाढवे , दिनेश गडदे , श्रीरंग माने, राजू माने, बिरुदेव वाघमोडे , सतीश वाघमोडे ,धुळाप्पा गाढवे, सोमनाथ गजघाटे, अमोल माने , शरद माने, नितीन गाढवे , सचिन माने, अच्युत गाढवे, सागर गाढवे, दादासाहेब गरंडे ,विशाल डोळसे, ज्ञानेश्वर लेंगरे, उमेश वाघमोडे, योगेश नरोटे, नितीन जगताप, सुहास वाघमोडे , अंकुश अलकुंटे , रोहन पडवळकर ,सोहेल पठाण आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages