सांगोला विद्यामंदिर पूर्व प्राथमिक विद्यालयात पालक सभा उत्साही वातावरणात संपन्न

सांगोला (कटुसत्य वृत्त): सांगोला विद्यामंदिर पूर्व प्राथमिक विद्यालय छोटा व मोठा शिशु या वर्गाची शैक्षणिक वर्ष 2022- 23 मधील पहिली शिक्षक -पालक सहविचार सभा खेळीमेळीच्या व उत्साही वातावरणात संपन्न झाली. सदर सभेच्या अध्यक्षस्थानी पूर्व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. महारनवर मॅडम उपस्थित होत्या.
सदर शिक्षक पालक सहविचार सभेमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शारीरिक विकासासाठी विद्यालयात कोणकोणत्या स्पर्धा, उपक्रम राबविणार आहे याची माहिती देण्यात आली. दोन वर्षानंतर शाळा सुरू झाल्या आहेत त्या दृष्टीने विद्यालयात विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालयात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. याच कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण प्रगती व आदर्श व्यक्तिमत्व घडवण्यास मदत होते. शिक्षक पालक सहविचार सभेमुळे विद्यार्थी विकासासाठी हातभार लागतो म्हणून, विद्यालयात पालक सभेचे आयोजन केले जाते .
विद्यार्थी विकासात पालकांचा सुद्धा सहभाग महत्वाचे असल्याने शिक्षक पालक सहविचार सभेचे आयोजन केले जाते सदर पालक सभेसाठी पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला आहे .यावेळी सहशिक्षिका कु. बुंजकर मॅडम व कु.झपके मॅडम यांनी वर्षभर राबविण्यात येणारे स्पर्धा व उपक्रम याची माहिती पालकांना दिली .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.तांबोळी मॅडम यांनी व आभार कु. बिराजदार मॅडम यांनी केले.
No comments:
Post a Comment