कॉम्रेड पानसरे अंनिसचे दाभोळकर हत्या प्रकरण एटीएस कडे सोपवा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 22, 2022

कॉम्रेड पानसरे अंनिसचे दाभोळकर हत्या प्रकरण एटीएस कडे सोपवा

कॉम्रेड पानसरे अंनिसचे दाभोळकर हत्या प्रकरण एटीएस कडे सोपवा

              मुंबई, (नासिकेत पानसरे):- कॉम्रेड गोविंद पानसरे आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष नेरेंद्र दाभोळकर यांचे हत्या प्रकरण एटीएस कडे सोपवावे लागेल असे  निरीक्षण कोर्टाने नोंदविले आहे.

              ९। १० वर्ष होऊनही या घटनेचा तपास अद्यापही यंत्रनांना लावण्य्यात यश आले नाही त्यामुळे हे  प्रकरण आता तपासासाठी दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवावेच लागेल, असे निरीक्षण कोर्टाने त्यांनी नोंदविले. याबाबत एक ऑगस्टपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश कोर्टाने राज्य सरकारला दिले. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासाची माहिती देण्यासाठी राज्य सरकारने वेळ वाढवून मागितला. त्यामुळे त्यांना खंडपीठाने चांगलेच धारेवर धरले. या प्रकरणाच्या तपासाला आधीच विलंब झाला आहे, आणखी किती विलंब करणार, असा सवाल कोर्टाने केला. यावर आता एटीएसकडे हे प्रकरण वर्ग करावेच लागेल, असे कोर्टाने म्हटलेआहे.

              अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकरांची पुण्यात २० ऑगस्ट २०१३ रोजी हत्या झाली. त्यानंतर २० फेब्रुवारी २०१४ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे नेते काँम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापुरात हत्या झाली. या प्रकरणांचा तपास करण्यासाठी सरकारकडून विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापना करण्यात आले आहे. एसआयटीच्या तपासावर नाराजी व्यक्‍त करत दाभोलकर, पानसरे कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages