दत्तामामा मुळे यांचा सोमवारी फडकुले सभागृहात गैरव सोहळा..! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 22, 2022

दत्तामामा मुळे यांचा सोमवारी फडकुले सभागृहात गैरव सोहळा..!

दत्तामामा मुळे यांचा सोमवारी फडकुले सभागृहात गैरव सोहळा..!

                 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- येथील बांधकाम व्यावसायीक दत्तामामा मुळे यांची महाराष्ट्र राज्य बिल्डर असोसिएशनच्या चेअरमनपदी नुकतीच निवड झाली. या निवडीबद्दल त्यांचा सोमवार, 25 जुलै रोजी जाहीर नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

                 बिल्डर्स असोसिएशन ही राज्यातील कंत्राटदार, बांधकाम व्यावसायीक यांच्यासाठी काम करणारी संघटना आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात या संघटनेची स्थापना झाली. या संघटनेच्या अध्यक्षपदी दत्तामामा मुळे यांची निवड हा सोलापूरकरांचा बहुमान आहे. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या युवकाने घेतलेली झेप सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. या प्रेरणादायी व्यक्तीमत्त्वाचे कौतुक करण्यासाठी विविध क्षेत्रातील मंडळींनी एकत्र येउन या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. निर्मलकुमार फडकुले सभागृहात सोमवारी सायंकाळी 5.30 वाजता हा कार्यक्रम होत आहे.

                 मराठा सेवा संघाचे संस्थापक अॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते दत्ता मुळे यांचा जाहीर सत्कार होईल. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, माजी आमदार रेखा खेडेकर, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दिलीप माने यांची उपस्थिती असेल. कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, पंचायत समिती सदस्य जालिंदर लांडे, मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे, अश्विनी सहकारी रुग्णालयाचे चेअरमन बिपीन पटेल, डिजीटल मिडीयाचे महाराष्ट्र अध्यक्ष राजा माने, उद्योगपती शरद ठाकरे, माजी महापौर महेश कोठे, उद्योगपती दत्ताअण्णा सुरवसे, क्रेडाईचे चेअरमन सुनिल फुरडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संतोष पवार, स्वामी समर्थ अन्नक्षत्र मंडळाचे अध्यक्ष अमोलराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती असेल. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन गौरव सोहळा समितीचे स्वागताध्यक्ष अमोल शिंदे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages