महुद बु येथील निकृष्ट काम तात्काळ थांबवावे - अभिषेक कांबळे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 19, 2022

महुद बु येथील निकृष्ट काम तात्काळ थांबवावे - अभिषेक कांबळे

महुद बु येथील निकृष्ट काम तात्काळ थांबवावे - अभिषेक कांबळे

प्रादेशिक कार्यालय पुणे येथे लवकरच करणार तक्रार

                 सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला तालुक्यातील महुद बु येथील गटारीचे काम ठेकेदार मनमानी,आणि चुकीच्या पद्धतीने करीत आहेत, माञ वरिष्ठ अधिकारी जाणून बुजून या कामाकडे दुर्लक्ष करीत आहेत, यासाठी लवकरच पुणे येथील प्रादेशिक कार्यालय पुणे येथे कारवाई करण्याची मागणी करणार असल्याची माहिती काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक कांबळे यांनी दिली. महुद बुद्रुक ता.सांगोला  येथील "गटारीचे" काम तात्काळ थांबविण्याची मागणी ही त्यांनी केली आहे. 

                 सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूचनेनुसार रस्त्याच्या मध्यापासून ९ मीटर अंतरावर गटार अपेक्षित असताना ठेकेदारांनी तसे गटाराचे काम केले नाही. त्याचप्रमाने इस्टीमेटप्रमाणे पीसीसी न करता,डायरेक्ट राफ्ट टाकून काम सुरु आहे. सदर कामास माती मिश्रित वाळू, सिमेंटचे प्रमाण इस्टीमेटप्रमाणे नाही, स्टील डिव्हायडींग बार इस्टीमेटप्रमाणे वापरले नाहीत.९ मीटरचा नियम फक्त भीमनगर, साठेनगर वस्तीतील घरे पाडण्यासाठिच का? असा ही सवाल कांबळे यांनी उपस्थित केला आहे.

                 सदरचे काम जर नियमानुसार केले नाही तर लवकरच या अन्यायकारक व निकृष्ट कामाचा दर्जा संदर्भात संचालक, सार्वजनिक बांधकाम विभाग प्रादेशिक कार्यालय, पुणे येथे भेट घेऊन संबंधित कंपनी व ठेकेदारांवर कारवाईची मागणी करणार, असल्याचा इशारा शेवटी अभिषेक कांबळे यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages