रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येत्या २ ऑगसट रोजी नवीदिल्लीत स्वातंत्र्याचा अमृत महोसव सोहळ्याचे आयोजन - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 19, 2022

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येत्या २ ऑगसट रोजी नवीदिल्लीत स्वातंत्र्याचा अमृत महोसव सोहळ्याचे आयोजन - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येत्या २ ऑगसट रोजी नवीदिल्लीत स्वातंत्र्याचा अमृत महोसव सोहळ्याचे आयोजन - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

                मुंबई (नासिकेत पानसरे):- रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येत्या दि.२ ऑगस्ट  रोजी दुपारी 4 वाजता नवी दिल्लीत तालकटोरा  स्टेडियम येथे स्वतंत्र्याचा  अमृत महोत्सव सोहळा रिपब्लिकन पक्षातर्फे आयोजित करण्यात आल आहे. रिपब्लिकन पक्षांतर्फे आयोजित स्वातंत्र्याचा  अमृत महोसव या सोहळ्याचे उदघाटन भाजपचे राष्टीय अध्यक्ष खा. जे पी .नडडा  यांच्या हस्ते करण्यात येणार असून या  कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नितिन गडकरी उपस्थित राहणार आहेत. रिपब्लिकन पक्षाने आयोजित केलेल्या स्वतंत्रच्या सुवर्ण महोसव अर्थात आझादीका अमृत महोसव हा कार्यक्रम  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेत आयोजित करण्यात आला आहे. 

                येत्या दिनांक २ ऑगेस्ट रोजी दुपारी 4 वाजता  नवी दिल्लीत तालकटोरा  स्टेडियम येथे रिपब्लिकन पक्ष्यांच्या वतीने आझादीका अमृत महोसव सोहळ्याचे आयोजन करणात आले आहे. या सोहळ्यात अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून देशभरातील रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते देखील उपस्थित राहणार आहे.

                भारतीय स्वातंत्र्याचा यंदा  ७५ वा वर्धापन दिन  अर्थात स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सव साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या संकल्पनेतून देशभर आणि जगभर आझादीका अमृत महोत्सव साजरा होत आहे.  भारतीय स्वातंत्र्य लढयात स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या  योगदानाचा कृतज्ञ गौरव; स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृतींना उजाळा देत देशप्रेम जागणविण्याची द्विगुणीत करण्याचा महोत्सव म्हणजे आझादी का अमृतमहोत्सव आहे.आझादीका अमृत महोत्सवच्या माध्यमातुन भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या शूर , महान स्वतंत्र्यवीरांचा गौरव आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या  इतिहासाचा गौरव  आझादीका अमृत महोत्सव या कार्यक्रमातून  करण्यात येत आहे. रिपब्लिकन पक्षातर्फे आझादी का अमृतमहोत्सव येत्या दि.2 ऑगस्ट रोजी नविदिल्लीत तालकटोरा स्टेडियम येथे साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी  प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages