सांगोला नगरपरिषदेमार्फत "पीएम स्वनिधी" योजनेची प्रभावी अंमलबजावणी" - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 16, 2022

सांगोला नगरपरिषदेमार्फत "पीएम स्वनिधी" योजनेची प्रभावी अंमलबजावणी"

सांगोला नगरपरिषदेमार्फत "पीएम स्वनिधी" योजनेची प्रभावी अंमलबजावणी"

आजअखेर २२७ पथविक्रेत्यांना विना तारण कर्जा चे वितरण

               सांगोला (कटुसत्य वृत्त): कोविड १९ काळात लॉकडाऊन मूळे रोजगार गमावलेल्या पथविक्रेत्यांची विस्कटलेलि आर्थिक घडी बसवून त्यांच्या व्यवसायांना नवीन उभारी देण्यासाठी त्यांना बँकेकडून विना तारण कर्ज उपलब्ध करुन देण्याऱ्या 'पीएम स्वनिधि' योजनेची सांगोला नगरपरिषदे मार्फत प्रभावी अंमलबजावणी सुरु असून यांतर्गत नुकतेच शहरातील २७ पथविक्रेत्यांना कार्यालयीन अधीक्षक श्रीमती अभिलाषा निंबाळकर यांच्या हस्ते कर्जाचे वितरण करण्यात आले.

               गेल्या वर्षभरापासून नगरपरिषदेमार्फत सांगोला शहरातील भाजी, फळे, तयार खाद्य पदार्थ, चहा, भजीपाव, अंडी, कापड, चप्पल, उत्पादित वस्तू, रस्त्यावरील केशकर्तन, चर्मकार, पानपट्टीधारक इत्यादी पथविक्रेत्यांना त्यांच्या व्यवसायासाठी विनातारण खेळत्या भागभांडवलाचा पतपुरवठा केला जात आहे.

               केंद्र शासनाच्या या योजनेत ज्या पथ विक्रेत्यांनी प्रथम १०,०००/- इतक्या कर्जाची परतफेड वेळेत केली आहे त्यांना द्वितीय र.रु. २०,०००/- चे कर्ज व ज्या पथ विक्रेत्यांनी र.रु. २०,०००/- इतक्या कर्जाची परतफेड वेळेत केली आहे अशांना तृतीय र.रु. ५०,०००/- चे कर्ज मिळण्याची तरतूद केली आहे.आजअखेर सांगोला नगरपरिषदे मार्फत २२७ पथविक्रेत्यांना दहा हजार रुपये याप्रमाणे २२ लाख ७० हजार रुपयाचे कर्ज राष्ट्रीयकृत बँकेमार्फत वाटप करण्यात आले आहे.

               सांगोला शहरातील जास्तीत जास्त पथविक्रेत्यांना या योजनेचा लाभ होण्याच्या दृष्टीने मा.मुख्याधिकारी श्री कैलास केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला नगरपरिषदेने दि. ८ जुलै रोजी *"पीएम स्वनिधी अकाम ड्राईव"* या  कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी नगरपरिषदेच्या कार्यालयीन अधिक्षक श्रीमती अभिलाषा निंबाळकार यांच्या हस्ते २७ पथ विक्रेत्यांना कर्ज मंजुरीचे पत्र देऊन डिजिटल व्यवहाराविषयी प्रशिक्षण दिले गेले.

               सदर कार्यक्रम कार्यालयीन अधिक्षक श्रीमती अभिलाषा निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली व बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक सहित विविध राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवस्थापक तसेच नगरपरिषदेचे अधिकारी योगेश गंगाधरे,बिराप्पा हाके, विजयकुमार कन्हेरे,जितेंद्र गायकवाड,अमित कोरे यांच्या उपस्तीथीत पार पडला.

               सांगोला शहरातील लहान, गरजू पथ विक्रेत्यांसाठी ‘ पीएम स्वनिधी‘ योजना नवसंजीवनी ठरेल असा विश्वास वाटतो.या योजने अंतर्गत १०,००० रुपयांपासून टप्प्ाटप्प्याने ५०,००० रुपयांपर्यंतचे विनातरण कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. - कैलास केंद्रे (मुख्याधिकारी, सांगोला नगरपरिषद)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages