स्व. गणपतराव देशमुख स्मरणार्थ चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोल्यात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, July 17, 2022

स्व. गणपतराव देशमुख स्मरणार्थ चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोल्यात

 स्व. गणपतराव देशमुख स्मरणार्थ चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोल्यात


उद्घाटन कार्यक्रमास ना.नितीन गडकरी तर समारोपास, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल येणार


सांगोला (जगन्नाथ साठे):-  सांगोला येथे दि . २३ व २४ जुलै  २०२२ रोजी चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन आयोजित करण्यात आली असल्याची माहिती स्वागताध्यक्ष प्रा संजय शिंगाडे यांनी सांगोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. सदर साहित्य संमेलन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहात होणार आहेत. या वेळी साहित्य संमेलन संस्थापक डॉ अभिमन्यु टकले, विष्णू देशमुख, दत्ता जानकर, उल्हास धायगुडे, कुंडलिक आलदार, राजेंद्र देशमुख, बाळकृष्ण कोकरे, नवनाथ शिंगाडे 
आदि मान्यवर उपस्थित होते.
    या संमेलनाचे अध्यक्ष आर एस चोपड़े अहिल्या शिक्षण संस्था सांगलीचे अध्यक्ष आहेत . प्रा . संजय सिंगाड़े सर हे स्वागत अध्यक्ष आहेत . पाहिले साहित्य संमेलन २०१७ ला सोलापुर येथे झाले . दूसरे साहित्य संमेलन २०१८ ला लातूर येथे झाले . तीसरे साहित्य संमेलन म्हसवड जि सातारा येथे २०१ ९ ला झाले . चौथे साहित्य संमेलन मा.आमदार गणपतराव देशमुख यांच्या इच्छेनुसार सांगोला येथे जाहीर झाले होते . पूर्ण तैयारी झाली होती . पण कोविड १ ९ मुळे स्थगित करण्यात आले होते . हे समेलन स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ होणार आहे . सदर साहित्य संमेलन हे   तीन दिवस चालणार आहे.या समेलनात २५ ते ३० हजार विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देशभरातुन हजेरी लावनार आहेत.

         या संमेलनात दोन दिवस भरगच्च असे कार्यक्रम आहेत . शनिवार दिनांक २३/७/२०२२ रोजी साहित्य दिंडीचा कार्यक्रम सकाळी आठ तें साडे अकरा या वेळेत होणार आहे. उपस्थित मान्यवराच्या हस्ते दिंडीचे उद्घाटन होईल . दिंडी मधे ४० सजवलेले रथ असतील . स्थात ऐतिहासिक वेश भूषा धारण केलेले विद्यार्थी शिक्षक कलाकार असतील . यामध्ये धनगर जातीचा  इतिहास , धर्म , संस्कृति , साहित्य , रूढ़ि , परंपरा , चाली , रीती , शैक्षणिक प्रबोधन रथ , सजीव देखावे , लेजिम , भजनी मंडल , गजीढोल , शोभा यात्रा असतील . साहित्य नगरीचे नाव संत बाळु मामा नगरी असे असेल . तर ग्रंथ दालनाचे नाव संत कनकदास नगरी असे असेल . साहित्य पीठास कवी कालिदास पीठ असे नाव देण्यात येईल. या सर्व नगरीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल . उद्घाटन सोहळा दुपारी बारा ते तीन या वेळेत होणार आहे. भंडारा उधळून गजी ढोलच्या गजरात येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा देत साहित्य संमेलनाचे उद्घाटन होईल. फ़क्त उद्घाटन आणि समारोप सोहळ्यास राजकीय नेत्यांना परवानगी राहील, उद्घाटन कार्यक्रमध्ये संस्थापक संमेलन अध्यक्ष , सोलापुर जिल्हा पालकमंत्री, स्थानिक आमदार , खासदार , साहित्यिक , सामाजिक , शैक्षणिक , उद्योग , प्रशासन विभागातील मान्यवर असतील. नविन साहित्याकांच्या साहित्याचे प्रकाशन होईल . शिक्षण साहित्य,पत्रकारिता, वैद्यकीय,सामाजिक , प्रशासन क्षेत्रातील १५ आदर्श मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात येईल . स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख आदर्श आमदार हा पुरस्कार  नागो गाणार शिक्षक आमदार नागपूर यांना घोषित करण्यात आला आहे . तसेच भारत देशातील एक आदर्श लोकसेवक मुख्यमंत्री यांची निवड करण्यात येणार आहे. यामध्ये समाजाच्या वतीने रोख एक लक्ष रुपये शाल श्रीफळ काठी घोंगडी देऊन धनगरजमाती मार्फत पुरस्कार देऊन भव्य सत्कार करण्यात येईल. तीन ते सायंकाळी सहा वाजे पर्यंत स्पर्धात्मक सांस्कृतिक कार्यकम असेल . याचे उद्घाटन सांगोला नगरीचे नगराध्यक्ष करतील . या मधे अहिल्या शिक्षणसंस्था सांगली आणि विवीध शाळा कॉलेजेस सहभाग घेतील . या मध्ये धनगरी गीते ओव्या , धनगरी नृत्य असतील . सायंकाळी ६ ते ८ वाजता परिसवांद आहेत . विषय : धनगर साहित्याचा विविध क्षेत्रावर होणारा परिणाम वक्ते : मा राम लांडे लेखक नवनाथ गोरे लेखक , प्रा मुकुंद वलेकर विषय धनगर सारा एक वक्ते संजय सोनवानी ईतिहास संशोधक , लेखक , रात्री ८ ते ११ कवी संमेलन होणार आहे . कवी संमेलन अध्यक्ष शिवाजी बंडगर ग्रामीण साहित्यिक हे असतील . सूत्र संचालन भरत दौंडकर कवी हे करतील ह भ प श्यामसुंदर महाराज कवी ही प्रमुख उपस्थिती असेल . कविसम्मेलनात ४० कवी भाग घेणार आहेत . रविवार दिनांक २४/७/२०२२ रोजी दिवसभर परिसवांद चर्चा सत्र अणि व्याख्याने होतील . विषय ; धनगरांचा राजकीय प्रवास वक्ते : एडवोकेट अण्णा राव वक्ते : पाटील , प्रा डॉ किसन माने . विषय : धनगर साहित्याकांची जबाबदारी , चिंतामणी सहस्त्रबुद्धे संपादक दै तरुण भारत सांगली डॉ मधुकर सलगरे लेखक लातुर . विषय : धनगर समाज्याच्या समस्या मिडिया लक्ष्य का वेधून घेत नाही . वक्ते : मा सुभाष बोंद्रे कार्यकारी संपादक दै . दिव्य मराठी . श्यामसुंदर सोन्नर महाराज वरिष्ठ पत्रकार विषय होळकर श्याहीच्या इतिहासातून काय घ्यावें वक्ते : प्रा डॉ यशपाल भिंगे , मा सुभाष माने मा संचालक सहकार पणन महामंडळ विषय : धनगर आरक्षण वक्ते मा सुभाष पाटिल खेमनार मा कृषि संचालक मा गणेश दादा हाके बीजेपी प्रवक्ते . विषय : महिलांची सामाजिक जबाबदारी डॉ ज्योति सुळ समाजीक कार्यकर्ती , डॉ स्नेहा सोन सोनकाटे , सौ रुक्मिणी गलांडे डीसीपी पुणे . विषय : प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या जबाबदार्या वक्ते तुषार ठोम्बरे अप्पर जिल्हाधिकारी , दिलीप पालवे निवृत्त कार्यकारी अभियंता . समारोप सोहळा : सांयकाळी ५ ते ७ या वेळेत घेण्याचे नियोजन केले आहे . प्रस्तावनेचे भाषण संस्थापक अध्यक्ष डॉ अभिमन्यु टकले हे करतील . ठराव ही मांडतील व त्याच्या प्रती उपस्थित लोक प्रतिनिधी यांना देतील . स्वागत अध्यक्ष संजय , शिंगाडे सर यांचे भाषणहोईल . उपस्थित सर्व क्षेत्रातील मान्यवर सत्कार , स्वागत सोहळा होईल . मनोगत व्यक्त करतील . पुरस्कार वितरण सोहळा होईल व साहित्य संमेलन अध्यक्ष समारोप भाषण होईल . समारोप सोहळा प्रमुख पाहुणे यांचे भाषण झाले की आभार प्रदर्शन होईल . कार्यक्रम सांगता होईल . प्रमुख उपस्थिती मध्ये . संजय सोनवणी लेखक , इतिहास संशोधक , पटकथा लेखक पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मालिका व अध्यक्ष पहिले धनगर साहित्यसंमेलन सोलापूर . अध्यक्ष मुरहरी केळे संत साहित्य लेखक , व संचालक विद्युत वितरण महाराष्ट्र शासन व तिसरे साहित्य संमेलन म्हसवड अध्यक्ष प्रा.डा. यशपाल भिंगे प्राख्यत लेखक व वक्ते डा . अरूण गावडे , समाज सेवक . आण्णासाहेब डांगे माजी मंत्री , मा.राम शिंदे माजी मंत्री व उपाध्यक्ष भाजप , मा . आमदार रामराव वडकुते , मा . आमदार हरिदास भदे , आमदार गोपीचंद पडळकर , शरदश्चंद्र पवार अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस दत्तात्रय भरणे सोलापूर . प्रणिती शिंदे आमदार सोलापूर . स्थानिक सर्व आमदार , खासदार . नगराध्यक्ष , महापौर सोलापूर , जिल्हा परिषद अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत . साहित्य संमेलनाची तयारी जोरदार चालू आहे . हे व्यासपीठ सर्व क्षेत्रातील जाती धर्मातील सन्माननीय मान्यवर यांच्या साठी सदैव खुले राहील . तरी राज्यातील सर्व क्षेत्रातील सन्माननीय मान्यवर यांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन संयोजन समिती मार्फत करत आहोत . साहित्य संमेलन वेबसाईट उघडल्यानंतर go to क्लिक करा . 

आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला राज्यस्तरीय पुरस्कार पुढीलप्रमाणे  

काठी , घोंगडे , शॉल , श्रीफळ , प्रमाणपत्र , स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे .   ना.गो. गाणार शिक्षक आमदार नागपूर यांना स्व . गणपतराव देशमुख आदर्श आमदार पुरस्कार जाहिर करण्यात येत आहे . बाळासाहेब वाघमोडे - आय.पी.एस.पोलिस अधिक्षक पालघर / ठाणे यांना सुभेदार मल्हारराव होळकर आदर्श प्रशासक पुरस्कार . तानाजी वाकडे व सौ . कल्पना वाकडे आदर्श माता , पिता पुरस्कार . अखंड होळकरशाही ग्रंथ लेखक उज्वलकुमार माने , सोलापूर या पुस्तकास आहिल्यादेवी होळकर आदर्श साहित्य पुरस्कार . डॉ . शिवाजीराव ढोबळे - आदर्श वैद्यकीय सेवा पुरस्कार निवांत कोळेकर - सांगली बॅरीस्टर टी.के. शेंडगे , आदर्श शिक्षक व समाजसेवक पुरस्कार धुळाभाऊ कोकरे करमाळा महात्मा ज्योतिबा फुले आदर्श प्रयोगशील शेतकरी पुरस्कार दिलीपभाऊ एडतकर मालक व संपादक दैनिक विदर्भ मतदार आमरावती यांना कवी कालीदास जीवन गौरव पुरस्कार देण्यात येनार आहे.सचिन कवले समाजकल्याण उपायुक्त महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार,मधुकर भरणे पुणे आदर्श उद्योजक पुरस्कार सौ . रुक्मिणी गलांडे पोलीस भीमाबाई होळकर आदर्श सेवा पुरस्कार ,बाळासाहेब एरंडे सांगोला आदर्श समाजसेवा व उद्योजक पुरस्कार ,उपअधिक्षक , पुणे, आनंदा गोरख माने सामाजिक कार्यकर्ते राजमाता प्रतिष्ठान सांगोला, मोहन मस्के आदर्श पत्रकार पुरस्कार, सामाजिक कार्यकर्ता म्हणून आदित्य फतेपुरकर यांना जाहीर करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages