नंदुरबार जिल्हा शिवसेना प्रमुख डॉ .मोरे यांचा भाजपा मध्ये प्रवेश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 25, 2022

नंदुरबार जिल्हा शिवसेना प्रमुख डॉ .मोरे यांचा भाजपा मध्ये प्रवेश

नंदुरबार जिल्हा शिवसेना प्रमुख डॉ .मोरे यांचा भाजपा मध्ये प्रवेश

सांगली जिल्ह्यातील १०० काँग्रेस कार्यकर्तेही भाजपा मध्ये

                  मुंबई, (कटुसत्य वृत्त): नंदुरबार जिल्हा शिवसेना प्रमुख डॉ.विक्रांत मोरे, नगरसेविका शोभाताई मोरे, नगरसेवक अर्जुन मराठे, नगरसेवक मिलिंद बाफना यांनी शनिवारी पनवेल येथे भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. याच वेळी पलूस (जि. सांगली ) येथील उद्योजक आणि सुमारे १०० काँग्रेस कार्यकर्त्यांनीही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

                  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय प्रभारी खा.सी.टी.रवी, प्रदेश सरचिटणीस आ.श्रीकांत भारतीय, केंद्रीय प्रवक्त्या खा.डॉ.हीना गावित, माजी मंत्री आ.विजयकुमार गावित, सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages