शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला ? ; २५ आमदारांना दिली जाणार शपथविधी

मुंबई, (नासिकेत पानसरे):- काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाल्यानंतर राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होईल असे सांगण्यात येत आहे.दरम्यान नव्या राष्ट्पती दौपदी मुर्मू यांचा शपथविधी होणार असल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली व्यस्त असणार त्यानंतर १ऑगस्ट रोजी पात्र अपात्रतेची सुनावणी सुप्रीम कोर्टाच्या विशेष खंडपीठाकडे असल्याने त्याचा विचार करूनच मंत्रीमंडळाचा विस्तार होईल.असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
२५ किंवा २६ जुलै अथवा १ ऑगस्ट दरम्यान शपथविधी होऊ शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. या मंत्रीमंडळात २५ आमदार शपथविधी घेतील असेही सांगितले जात आहे. त्यामुळे संभाव्य यादीत कोणाकोणाची वर्णी लागणार याबाबत अनेकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काहींनी तर देव पाण्यात घातले आहेत. तर काहींनी साकडे घालत नवसही केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार भाजपाकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार,गिरीश महाजन,आशिष शेलार, जयकुमार रावल,राधाकृष्ण विखेपाटील तर शिंदे गटाकडून उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संदीपान भुमरे, यांची नावं चर्चेत आहेत.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्या नंतर मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, आता लवकरच म्हणजे येत्या रविवार किंवा सोमवारी मंत्री मंडळ विस्तार होईल, अशी माहीती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. भाजपा आणि एकनाथ शिंदे गट असे दोघांचे मिळून किमान २५ आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील. सात दिवसांनंतर पावसाळी अधिवेशसुद्धा पुढील महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार आहे. आता या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी मिळणार, याकडे शिंदे गटातील सर्व आमदारांच्या सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आपली वर्णी लागावी याकरता शिंदे गटातील फुटीर आमदार आपले लक्ष वेधावे म्हणून शक्ती प्रदर्शन करताना दिसत आहेत.
महाविकास आघाडी सरकार पाडत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर शिवसेना आमदारांचा गट आणि भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली. त्यामुळे संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे दोन तृतीयांश मंत्री असतील तर उर्वरित मंत्रिपदे शिंदे गटातील आमदारांना मिळतील, असं सांगितलं जात आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० शिवसेना आणि १० अपक्ष अशा ५० आमदारांचं पाठबळ आहे. चौघांच्या मागे एक, या सूत्रानुसार शिंदे गटाला एकूण १३ मंत्रिपदं मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपद अशी एकूण संख्या आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे दिल्लीतून कालच परतले असून पक्षश्रेष्ठीशी चर्चा करून मंत्रिमंडळाच्या यादी निश्चित करतील.
No comments:
Post a Comment