ग्रामविकास अधिकाऱ्यांना विस्तारअधिकारी म्हणून लवकरच पदोन्नती मिळणार - तात्यासाहेब पाटील

बेंबळे (कटुसत्य वृत्त): सोलापूर जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकाऱ्यांमधून पदोन्नतीने भरावयाच्या विस्तार अधिकारी या पदासाठी या महिना अखेर पदोन्नती प्रकिया घेण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिल्याचे ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष तात्यासाहेब पाटिल यांनी सांगितले. सोलापूर जिल्हा ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित मागण्या व अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचला पाटील उपस्थित होते.विस्तार अधिकारी पदोन्नतीची प्रक्रिया या महीना अखेर पूर्ण राबविण्यात येइल व तसेच निलंबित ग्रामसेवकांना आठ ते दहा दिवसांत पुनः स्थापित करण्यात येईल असे या वेळी सांगण्यात आले.याच प्रमाणे आश्वासीत प्रगती योजना कालबद्ध पदोन्नतीच्या १९ जुलै पर्यत आलेल्या फाईल पुर्ण झाल्या असून पंधरा दिवसांत आदेश मिळतील असे कळवण्यात आले.
प्रलंबित वैद्यकीय बील मंजूरी मिळणे बाबत आरोग्य विभागातील संबंधित अधिकारी यांच्याशी बैठक लावावी, पीएफएमस कपातीची व्यवस्था करणे बाबत बॅकेला पञ देणेबाबत सूचनाही देण्यात आली. विकास कामांची अंदाजपत्रक व मुल्यांकन वेळेत होण्याबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी सर्व विभागातील अधिकारी यांना पञ देण्यात येईल असे स्पष्ट केले. हर घर तिरंगा कार्यक्रमाची सर्व विभागातील संबंधित कर्मचारी यांना जबाबदारी देण्याबाबत चर्चा होऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्या बरोबर चर्चा करून ग्रामसेवकांना २५ टक्के जबाबदारी देण्याबाबत विनंती केली असल्याचे सांगितले.बाकी सरपंच, तलाठी, पोलिस पाटील यांना २५ टक्केजबाबदारी देण्यात येणार आहे.
यावेळी ग्रामसेवक संघाचे जिल्हा सचिव कैलास सुरवसे , ग्रामसेवक संघ पतसंस्थेचे चेअरमन रामभाऊ मिटकल,प्रताप गवळी,तात्यासाहेब साठे,रणजीत माळवे,संतोष माने, दिलीप लोखंडे, एस.जे.रकटे उपस्थित होते.
समाज कल्याण उपआयुक्त पुणे यांच्या कडे पाठपुरावा करून रोस्टर मंजूरी साठी ग्रामसेवक संघाने प्रयत्न केले होते,त्यामुळे ग्राम विकास अधिकारी यांना विस्तार अधिकारी पदोन्नतीचा लाभ होत आहे. - तात्यासाहेब पाटील (राज्याध्यक्ष, ग्रामसेवक संघ)
No comments:
Post a Comment