आदर्श स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मतदानाचा बजावला हक्क

कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- आदर्श पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कुर्डूवाडी येथे दिनांक २१ जुलै २०२२ बुधवार रोजी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी वेगवेगळ्या हाऊस मधून मतदानाचा हक्क बजावत हाऊस कॅप्टन, उप कॅप्टन व प्रिफेक्ट या पदांसाठी निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली.
यामध्ये विद्यार्थ्यांमधे व्यक्तिमत्व विकास,नेतृत्वगुण विकास,शैक्षणिक विकास,स्टेज डेअरिंग, सहकार्य भावना, संघ भावना, शिस्त, यासारख्या विविध गुणांचा विकास होण्यासाठी प्रत्येक हाऊस मधून सहा ते सात उमेदवारांनी आपला अर्ज भरून निवडणूक लढविली.यावेळी प्रत्येक हाऊसचे वेगळे मतदान केंद्र तयार करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रिसाइडिंग ऑफिसर व पोलिंग ऑफिसर म्हणून विद्यार्थ्यांनी चोख भूमिका बजावली.या मतदान प्रक्रियेतून विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रिया कशी चालते हे समजून आले.विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष ईव्हीएम मशीन द्वारे मतदान करून मतदानाचा हक्क बजावला.
संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळित पार पाडण्यासाठी कुबेर सर यांनी इलेक्शन कमिशनर व हांगे सर यांनी डेप्युटी कमिशनर ची भूमिका विभाग प्रमुख विजयकुमार लोंढे सर यांच्या मार्गदर्शनाखाली बजावली.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल सुरवसे व प्रकल्प संचालिका सौ.पूजा सुरवसे यांचे मार्गदर्शन लाभले.यासाठी सर्व शिक्षक वृंद यांनी निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी परिश्रम केले.
No comments:
Post a Comment