माढ्यात लोकमंगल पतसंस्थेच्या वतीने कविसंमेलन संपन्न

माढा (कटुसत्य वृत्त): लोकमंगल समूहाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त महाकवी कालिदास जयंती निमित्त माढ्यात कविसंमेलन पार पडले.शहरातील मदर सायन्स ज्युनियर काॅलेज मध्ये पार पडलेल्या संमेलनात कविंनी प्रतिसाद दर्शवला.
माॅसाहेब जिजाऊ च्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले.शेतकर्याच्या समस्यांसह ज्वलंत विविध विषयांवर कवीनी कविता सादर केल्या.दत्ताजी शिंदे सह अन्य कविंनी हास्यातुन प्रबोधन करीत कविता केल्या.यावेळी नगरसेवक शहाजी साठे,हनुमंत
परबत,दत्तात्रय शिंदे,डॉ.सोमेश्वर टोंगळे,नरेश कदम यांचेसह लोकमंगल शाखेतील अधिकारी कर्मचारी मदर काॅलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments