रिक्षा टॅक्सीसह पानटपरी भाजीवाल्यांसाठी होणार महामंडळ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 21, 2022

रिक्षा टॅक्सीसह पानटपरी भाजीवाल्यांसाठी होणार महामंडळ

रिक्षा टॅक्सीसह पानटपरी भाजीवाल्यांसाठी होणार महामंडळ शिवसेनेने केलेल्या टीकेला शिंदे सरकारचे सकारात्मक उत्तर

                  मुंबई (नासिकेत पानसरे):- शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर रिक्षावाला पान टपरीवाला भाजीवाला व वॉचमन deepa  अशा शब्दांनी हिनवले गेलेल्या बंडखोर एकनाथ शिंदे गटाला हि टीका प्रचंड जिव्हारी लागली असून सदर टीकेला सकारात्मक घेत या सर्वांसाठी तामिळनाडूच्या धर्तीवर महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय शिंदे सरकारने  घेतला आहे . येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

                  शिवसेनेच्या ३९ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केल्यानंतर शिवसेना नेते खा संजय राऊत व आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती. एकनाथ शिंदे याना रिक्षावाला, गुलाबराव पाटील यांना पानटपरीवाला ,प्रकाश सुर्वे यांना भाजीवालातर संदीपान भुमरे  असे ते यापूर्वी करीत असलेल्या व्यवसायाचा संदर्भ घेत  विशेषणे लावून त्यांना डिवचले होते यावेळी त्यांनी महिलांविषयी देखील अपशब्दांचा वापर केला होता. 

                  शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना हि टीका जिव्हारी लागली होती मात्र गुवाहाटीला वास्तव्यास असलेल्या या आमदारांनी सदर टीकेला प्रत्युत्तर दिले नव्हते मात्र आता हीच टीका सकारात्मक घेत राज्यातील साडे आठ लाख  रिक्षावाले तसेच ९० हजार परवानाधारक टॅक्सीवाले यांच्यासाठी तामिळनाडूच्या धर्तीवर महामंडळ स्थापन स्थापन करण्यात यावे अशी मागणी शिंदे गटाचे आमदार माजी मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना पत्र देऊन केली आहे ,यासंदर्भातील प्रस्ताव २०१३ पासून शासनस्तरावर प्रलंबित असून सदर  योजनेत रिक्षावाला पान टपरीवाला भाजीवाला व वाचमन तसेच देहविक्रय व्यवसायात असणाऱ्या महिला वर्गाचा देखील यात समावेश करून या सर्वाना कामगार वर्गाचे सर्व लाभ देण्यात यावे अशी मागणी  सामंत यांनी केली असून येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत सदर निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages