आझादी का अमृत महोत्सव निमित्त कार्यक्रम


आ. देशमुख यांनी दाखवला हुतात्मा एक्सप्रेसला हिरवा झेंडा
सोलापूर (कटुसत्य वृत्त): देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष म्हणजेच अमृत महोत्सव होत आहे त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध विभागांना हा महोत्सव साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. विभागाच्या वतीने हा महोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त सोलापूर ते पुणे दरम्यान धावण्याऱ्या हुतात्मा एक्सप्रेस ला आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
यावेळी डीआएम शैलेश गुप्ता, शैलेंद्रसिंह परिहार, वरिष्ठ व्यवस्थापक प्रदीप हिरडे, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी जी.पी. भगत, मंडल अभियंता साळवे, डॉ चिंचवाडे,अतुल लोहकरे तसेच रेल्वे विभागातील अधिकारी व कर्मचारी आणि प्रवासी उपस्थित होते.
यावेळी आमदार सुभाष देशमुख म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाले आहेत. सोलापुरात एक दिवस अगोदर स्वातंत्र्य मिळाले होते. यासाठी चार हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे. त्यामुळे या गाडीला हुतात्मा एक्स्प्रेस नाव दिले आहे. नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेला उपक्रम सर्वांनी साजरा करावा आणि घर घर मे तिरंगा लावावा. यावेळी आ. देशमुख यांच्या हस्ते सोलापूरच्या चार हुतात्म्यांच्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला.
No comments:
Post a Comment