आषाढी वारीच्या निमित्ताने सुविधा द्या - एकनाथ शिंदे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 6, 2022

आषाढी वारीच्या निमित्ताने सुविधा द्या - एकनाथ शिंदे

आषाढी वारीच्या निमित्ताने सुविधा द्या - एकनाथ शिंदे

              मुंबई (नासिकेत पानसरे): यावर्षी मोठ्या प्रमाणात वारकरी वारीमध्ये सहभागी होतील. यावर्षी पंढरपूरात गर्दी वाढेल. चंद्रभागेत स्नानासाठीची व्यवस्था चोख व्हावी. याठिकाणी चांगली स्वच्छता, त्यासाठी आवश्यक गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. काठावरील निर्माल्य कलशाची संख्या वाढवा. ते वेळोवेळी रिकामी होतील अशी व्यवस्था करा. असे आदेश एकनाथ शिंदे यांन दिले आहेत.

              शौचालयांची स्वच्छता महत्त्वाची आहे. त्यासाठी कर्मचारी चोवीस तास सज्ज राहावेत. त्यांना आवश्यक अशी स्वच्छतेचे उपकरणे, सामुग्री उपलब्ध करून द्या. कपडे बदलण्यासाठीच्या निवारा व्यवस्थेत वाढ करा.

              रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी गरज पडल्यास खासगी यंत्रणाचा सहभाग घ्यावा. दैनंदिन साफसफाई यासाठी आजुबाजूला असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या खासगी यंत्रणाचा सहभाग घ्यावा.

              मोठा पाऊस झाला तर पाणी साचू नये यासाठी व्यवस्था करा, त्यासाठी पंपाचा वापर करा. आरोग्य सुविधा औषधे, फवारणी तसेच तापाची, साथीच्या आजारांवरील औषधांचा पुरेसा साठा यांची आतापासूनच व्यवस्था करा. 

              चिखल, पाऊस, पाणी यामुळे गैरसोय होऊ नये अशी व्यवस्था करा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक अशा गोष्टी मास्क, सनिटायझर्सची आदी बाबींची व्यवस्था करा.

              पिण्याच्या पाण्याची चांगली व्यवस्था करा. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मदतीने आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांनी समन्वय राखावा. आवश्यक तेथे वैद्यकीय क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांची मदत घ्या. 

              यात्रेचा परिसर खड्डे मुक्त करा, खड्डे विरहीत परिसर व्हावा यासाठी तातडीने युद्ध पातळीवर नियोजन करा. अस्वच्छ, दुर्गंधी जागा स्वच्छ करा.

              दिंडी मार्गावरील अतिक्रमणे हटवा. हे मार्ग चिखल मुक्त राहील यासाठी उपाययोजना करा. वाहतूक मार्गांचे, व्यवस्थेचे चोखपणे नियोजन करा. 

              संपूर्ण नियोजनात वारकरी हा केंद्रबिंदू मानून काम करा. हि वारी, आषाढी वारकऱ्यांची आहे. त्यांच्यासाठी सर्व त्या सोयी सुविधा द्या. पोलीसांनी चांगला बंदोबस्त ठेवावा.‌ कोणत्याही परिस्थितीत त्यांची गैरसोय होऊ नये याकडे लक्ष द्या.

              आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी बांधवांच्या वाहनांना टोल माफ करण्यात येत आहे. त्याबाबतही सर्व यंत्रणाना निर्देश द्या. त्या वाहनांना स्टिकर्स देण्यात यावेत. गणेशोत्सवात ज्याप्रमाणे आपण व्यवस्था करतो, त्याप्रमाणे या वाहनांची नोंद करून या वाहनांना टोल माफ करण्यात यावी. अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची पंढरपूर वारी यात्रेसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती करा.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages