राज्यात पूरपरिस्थितीवर नियंत्रणासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 25, 2022

राज्यात पूरपरिस्थितीवर नियंत्रणासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात

 राज्यात पूरपरिस्थितीवर नियंत्रणासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात

मुंबई (कटूसत्य वृत्त):- राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून, पूरपरिस्थ‍ितीवर उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात केल्या आहेत.

मुंबई (कांजूरमार्ग-१, घाटकोपर-१) -२, पालघर -१, रायगड- महाड- २, ठाणे-२, रत्नागिरी-चिपळूण-२, कोल्हापूर-२, सातारा-१,  राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण १२ तुकड्या तैनात आहेत.नांदेड-१, गडचिरोली-१ अशा एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ)  च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

राज्यातील नुकसानीची सद्यस्थिती

राज्यात १ जून पासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे  २८ जिल्हे व ३०९ गावे प्रभावित झाली असून ८३ तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली आहेत. १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ११० नागरिकांनी  आपला जीव गमावला आहे तर २१८ प्राणी दगावले आहेत. ४४ घरांचे पूर्णत: तर २ हजार ०८६ घरांचे अंशत: नुकसान झालेले आहे.

राज्य आपत्ती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून आज सकाळी 10.30 वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिद्धीसाठी देण्यात  येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages