सामाजिक वनीकरण विभाग रायगड परिक्षेत्र माणगाव यांच्या माध्यमातून वन महोत्सव वृक्ष लागवड कार्यक्रम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 8, 2022

सामाजिक वनीकरण विभाग रायगड परिक्षेत्र माणगाव यांच्या माध्यमातून वन महोत्सव वृक्ष लागवड कार्यक्रम

सामाजिक वनीकरण विभाग रायगड परिक्षेत्र माणगाव यांच्या माध्यमातून वन महोत्सव वृक्ष लागवड कार्यक्रम

              बोरघर / माणगाव (कटुसत्य वृत्त): सामाजिक वनीकरण विभाग रायगड अलिबाग परिक्षेत्र माणगाव आजादी का अमृत महोत्सव वन महोत्सव वृक्ष लागवड कार्यक्रम धोरणानुसार उप वनसंरक्षक रोहा अप्पासाहेब निकत व सहाय्यक वनसंरक्षक सेल विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनागाली वनपरिक्षेत्र अधिकारी संरक्षण माणगांव व सामाजिक वनीकरण माणगांव यांचा संयुक्त विद्यमाने दिनांक १ जुलै ते १४ जुलै २०२२ या निर्धारित कालावधीत  वन महोत्सव वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

              या पार्श्वभूमीवर गुरुवार दिनांक ७/ ६/ २०२२ रोजी रायगड जिल्ह्याच्या माणगाव तहसील कार्यालया समोर वनमहोत्सव वृक्ष लागवड कार्यक्रम साजरा करण्यात आला. 

              सदर कार्यक्रमात उप विभागीय अधिकारी तालुका माणगाव प्रशाली दिघावकर, तहसिलदार तालुका माणगांव प्रियांका अहिरे, नायब तहसिलदार भाबड, वनपरिक्षेत्र अधिकारी अनिरुद्ध ढगे, लेखापाल हरेंद्र पालकर, वनपाल एस. सी. धायगुडे, बी. टी. पवार, सामाजिक वनीकरण विभाग माणगांव वनरक्षक अे. अे. पोकळ, व्ही जे भोर, के. एस. गायकवाड, पी वाय थोरात  व इतर कर्मचारी वर्ग तसेच ग्रामस्थ यांनी सक्रिय सहभाग घेऊन वृक्ष लागवड करून वन महोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages