हजारो वारकऱ्यांच्या आगमनामुळे बेंबळे परिसरात भक्तिमय वातावरण...


बेंबळे (कटुसत्य वृत्त): दिंड्या पताकांची गर्दी, टाळ मृदंगाचा ध्वनी, विणा - चिपळ्यांचा मधुर झंकार आणि विठू माऊलीचा जयजयकार अशा भक्तिमय वातावरणात बेंबळे परिसर सध्या व्यापून गेला आहे .वृत्तांत असा की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरीकडे येणाऱ्या हजारो लाखो वारकऱ्यांसहीत लहान मोठ्या पालख्यांनी आता सोलापूर जिल्हा्यात प्रवेश केला आहे. धुळे जळगाव नाशिक या खानदेश भागातून तसेच नगर शिर्डी कर्जत जामखेड या भागातून येणाऱ्या दींड्या व वारकरी करमाळा टेंभुर्णी परिसरातून पुढे पंढरपूरला जाण्यासाठी बेंबळे परिते घोटी करकंब मार्गे जात असल्याचे दिसून येत आहेत .टेंभुर्णी बेंबळे घोटी पंढरपूर हा अवघा 35 ते 40 किलोमीटरचा प्रवास असून टेंभुर्णी हरीनगर भोसलेवाडी बेंबळे घोटी या मार्गावरून हजारो वारकरी पंढरीकडे सध्या जात आहेत, सर्वत्र वातावरण भक्तीमध्ये झाले असून बेंबळे येथे येणाऱ्या दिंड्यांचे गावकऱ्यांच्या कडून स्वागत होत आहे. अनेक नागरिक दिंडीतील शेकडो वारकऱ्यांना भोजन देत आहेत तर अनेक जण चहा नाश्ता मिठाई केळी उपवासाचे पदार्थ दान करत आहेत. वारकऱ्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत स्वच्छता आरोग्य विद्युत प्रकाश व निवार्याची सोय करण्यात येत आहे. येथील ज्योतिबात देवस्थान ट्रस्ट तर्फे वारकऱ्यांची चांगली सेवा व सोय करण्यात येत आहे. दिंडी बरोबर येणारे वारकरी भजन कीर्तन अभंग असे कार्यक्रम करून विठू माऊलीचा जय जयकार करत आहेत, एकंदरीत परीसर भक्तीमय वातावरणात भारावून गेला आहे. हा संपूर्ण परिसर बागायती असल्यामुळे सर्वत्र अन्नदानाची रेल चेल दिसून येत आहे. टेंभुर्णी बेंबळे घोटी रस्ता खराब असल्यामुळे वारकरी व त्यांच्या बरोबरीच्या वाहनांची थोडी कुचंबणा होत आहे परंतु पाटबंधारे खात्याने कालव्यातून पाणी सोडले असल्यामुळे वारकऱ्यांना पाण्याची टंचाई अजिबात भासत नाही. मागील दोन वर्ष लाँकडाऊन होते त्यामुळे यावर्षी वारकऱ्यांची संख्या वाढलेली दिसून येत आहे व यामध्ये जेष्ठ नागरिकासहित युवक युवतींचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे, त्यामुळे अंदाजे 70 ते80 हजार वारकरी या मार्गावरून पंढरीकडे जातील असे दिसून येत आहे.
मिनी पालखी मार्ग
टेंभुर्णी बेंबळे घोटी चांभार विहिर या 18 किलोमीटरच्या रस्त्याला मिनी पालखी मार्ग म्हणून रस्ते विकास महामंडळाकडून मान्यता मिळालेली असून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून या मार्गासाठी 18 कोटी रुपये मंजुरीच्या प्रस्तावास मान्यता मिळालेली असल्याचे अधिकृत वृत्त आहे, त्यामुळे भविष्यकाळात सध्या आहे यापेक्षाही जास्त वारकऱ्यांची गर्दी या मार्गावरून दिसून येणार हे निश्चित
No comments:
Post a Comment