लोकमंगल तर्फे रोजगार, स्वयंरोजगार मेळावा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 12, 2022

लोकमंगल तर्फे रोजगार, स्वयंरोजगार मेळावा

लोकमंगल तर्फे रोजगार, स्वयंरोजगार मेळावा

                सोलापूर (कटुसत्य वृत्त):- महाराष्ट्र शासनाचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता  विभाग, लोकमंगल फाऊंडेशन आणि वर्कफोर्स सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या गुरुवार दि. 14 जुलै रोजी सोलापूरच्या विजापूर रोडवरील  शासकीय आय.टी. आय. मध्ये सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  

                या मेळाव्यात 30 ते 40 कंपन्या सहभागी होत असून त्यांच्या विविध प्रकारच्या 800 पेक्षा अधिक पदांसाठी ही भरती होणार आहे. बारावी उत्तीर्ण, विविध शाखांचे पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर, आय. टी. आय., अभियांत्रिकी पदविका आणि पदवीप्राप्त विद्यार्थी अशा उमेदवारांना नोकरी आणि स्वयंरोजगार मिळण्याची ही मोठी संधी आहे.  या साठी महास्वयं या संकेत स्थळावर ऑन लाईन पूर्व नोंदणी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती 14 जुलै रोजी सकाळी 10 वाजता घेतल्या जातील. आणि योग्य उमेदवारांना त्याच ठिकाणी निर्णय दिला जाईल. या संबंधीच्या अधिक माहितीसाठी फोन क्रमांक +919657709710 , 0217- 2950956 वर संपर्क साधावा. 

                या मेळाव्यात प्रीसिजन कॅमशाफ्ट, वाम्सी लॅब्स, बालाजी अमाइन्स, स्मृती ऑरगॅनिक्स, सृजन फूडस्‍ ‍, किरण  इन्फोटेक, कोठारी ॲग्रोटेक, एल आय ऑफ इंडिया, सिग्मा इलेक्ट्रिक, महिन्द्रा अँड महिन्द्रा, जीआरपी इत्यादी मान्यवर उद्योग सहभागी होत आहेत. 

स्वयंरोजगार आणि सरकारी सवलती

                याच कार्यक्रमात सकाळी 11 ते दुपारी दीड वाजेपर्यंत स्वयंरोजगार मार्गदर्शन सत्र घेण्यात येईल. ज्या उमेदवारांना  स्वत:चा व्यवसाय करण्याची इच्छा असेल त्यांना या सत्रात स्वयंरोजगार करणारांनासाठीच्या विविध सवलती देणाऱ्या शासकीय आणि निमशासकीय संस्था, यंत्रणा यांची माहिती दिली जाईल. या संधीचा लाभ अधिकात अधिक बेरोजगारांनी घ्यावा असे आवाहन लोकमंगल फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages