आदर्श मध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 12, 2022

आदर्श मध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी...

आदर्श मध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी...

पंढरीची वारी आदर्शच्या दारी...

                 कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- आदर्श पब्लिक स्कूल येथे आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनी भारुडे,अभंग,ओव्या सादर केल्या.पालकांनीही विद्यार्थ्यांसोबत वारीमध्ये उस्फुर्त सहभाग नोंदवला.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल सुरवसे व प्रकल्प संचालिका पूजा सुरवसे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची महाआरती करण्यात आली.

                 यामधे विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रुक्मिणी, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, संत सावतामाळी, निवृत्तीनाथ महाराज, गोरा कुंभार, चोखामेळा, मुक्ताबाई, जनाबाई, मिराबाई, बहिणाबाई, यासारख्या संतांच्या भूमिकेतून सहभाग नोंदवला.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक विभाग व सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages