शिववंशीय दशनाम गोसावी समाज संघटना यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 6, 2022

शिववंशीय दशनाम गोसावी समाज संघटना यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप

शिववंशीय दशनाम गोसावी समाज संघटना यांच्यातर्फे गरजू  विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप

              पुणे ( प्रविण शेंडगे ):- शिववंशीय दशनाम गोसावी समाज संस्था महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा यांच्या वतीने दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसेच इतर सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम व समाजातील विविध क्षेत्रातील  मान्यवरांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्याचा कार्यक्रम नेताजी सुभाष मंगल कार्यालय येथे पार पडला.दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, नोटबुक, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

              याप्रसंगी प्राध्यापक यशवंत गोसावी सर यांना समाजरत्न पुरस्काराने .विष्णू भारती ( चांडाळ चौकडी-पाटील) यांना कलारत्न , .रवींद्र भारती व श्रीकृष्ण गोसावी यांना उद्योग रत्न , .शशिकांत गिरी (API) यांना उत्कृष्ट पोलीस अधिकारी , .नंदकुमार गोसावी यांना समाजभूषण , .दशरथ गिरी यांना कृषिरत्न , महादेव बाजीराव गिरी व डॉक्टर अनिल गोसावी यांना आरोग्यरत्न , गोरख रतन गोसावी यांना उत्कृष्ट वन निरीक्षक व  ज्ञानेश्वर गोसावी यांना सन्मानचिन्ह देऊन अशा विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले...

              याप्रसंगी . शिवसंभा  गोसावी ( संस्थापक अध्यक्ष )  सुदाम किसन गोसावी (प्रदेशाध्यक्ष) .संदीप जालिंदर भारती (प्रदेश युवा अध्यक्ष)  सूर्यकांत भाऊ गिरीगोसावी ( कार्याध्यक्ष ) पंकज प्रकाश भारती (पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष) प्रकाश भारती (जिल्हाध्यक्ष), राजकुमार गोसावी (सचिव)  दादासाहेब गोसावी (खजिनदार) .वसंत गोसावी (सहसचिव)  संतोष गिरी (संपर्कप्रमुख ) .रामचंद्र गोसावी (संपर्कप्रमुख)   महेंद्र गोसावी ( कार्याध्यक्ष )  संकल्प गोसावी ,  सुरेश पुरी ,रंजीत गोसावी, रवींद्र गोसावी, सचिन गिरी, केशव गोसावी , दशरथ गिरी , अजिंक्य गोसावी ,निखिल गोसावी , विशाल गोसावी, गुरुदत्त गोसावी, विकास भारती तसेच तालुक्यातील तालुका अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages