विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून मध्यप्रदेशातील बस दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त

मुंबई (नासिकेत पानसरे):- "महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या अमळनेर आगाराची इंदूर-अमळनेर बस आज सकाळी मध्यप्रदेशातील खलगाट व ठिगरी दरम्यान पुलावरुन नर्मदा नदीत कोसळून झालेला अपघात तसेच अपघातात काही प्रवासी मृत्युमुखी पडल्याचे वृत्त क्लेशदायक आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून बचाव व मदतकार्य गतिमान करण्याच्या, जखमी प्रवाशांना आवश्यक वैद्यकीय उपचार पुरवण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत. जळगाव जिल्हा प्रशासनानेही अपघातग्रस्तांना व त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक मदत उपलब्ध करुन द्यावी. बस दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाशांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांच्या कुटुंबियाबद्दल शोकसंवेदना व्यक्त करत जखमी प्रवाशांची प्रकृती लवकर सुधारावी, अशी प्रार्थनाही अजित पवार यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment