लीड स्कूलच्या वतीने पायी दिंडी व रिंगण सोहळा संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 12, 2022

लीड स्कूलच्या वतीने पायी दिंडी व रिंगण सोहळा संपन्न

लीड स्कूलच्या वतीने पायी दिंडी व रिंगण सोहळा संपन्न

             कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त) :- आषाढी एकादशी चे औचित्य साधून सोमवार दि.११जुलै रोजी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन लीड स्कूलच्या वतीने करण्यात आले होते.यावेळी या पायी दिंडी व रिंगण सोहळा या कार्यक्रमाचे कौतुक सहायक पोलिस निरीक्षक विक्रांत बोधे यांनी केले.प्रारंभी लीड स्कूल पायीदिंडीत पालखीचे पूजन व प्रसादाचे वाटप मुख्याध्यापक वैभव अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

             या दिंडीत रिंगण सोहळा,अभंन,ओव्या,गवळणी, भारूड,फुगडी,फेर आदि कार्यक्रम सादर केले गेले.या सोहळ्यात भगवी पताका,टाळ,मृदुंग,वीणा,ज्ञानोबा-तुकाराम आशा वेगवेगळ्या नामस्मरणांचा जयघोष करत आध्यात्म आणि संस्कार  व वृक्षसंवर्धन याचा संदेश देण्यात आला.

             यामध्ये प्रि-प्रायमरी, प्रायमरी,मिडल व हायस्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांनी विठ्ठल,रुक्मिणी,वेगवेगळे संत व वारकऱ्यांच्या वेशभूषेत दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते.दिंडीतील विठ्ठल-रुक्मिणी व संतांचे सर्व स्तरातील भाविकांनी दर्शन घेतले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages