जनावरे चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश मोहोळ गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी

दोन आरोपीसह आठ लाखाचा मुद्देमला हस्तगत असतात
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- वेगवेगळ्या ठिकाणच्या गाई म्हैस शेळ्या मोटरसायकल चोरास मोहोळ गुन्हे शाखेच्या पोलीसांनी केले दोन जणांला जेरबंद करून गाई म्हैस शेळ्या मोटरसायकल टेम्पो असा आठ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस पथक हे विनोद भागात पेट्रोलिंग करीत असताना १७ जुन रोजी पेनुर ता मोहोळ येथे एक जीतु कंपनीचा पांढया रंगाचा टेम्पो वेगाने मोहोळच्या दिशेने जात जात असल्याचे निदर्शनास आले यामध्ये संशय आल्याने त्यांचा पाठलाग करून सदरचे वहान थांबवुन त्याना सदर वहाणामध्ये असलेल्या व्यक्तींना वहानामध्ये काय आहे असे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यांना अधिक विश्वासता घेऊन सदर वहानामधिल जनावरे कोठुन आणलेबाबत विचारणा केली त्यावेळी त्यांनी सदरची जनावरे पेनुर येथुन चोरी केल्याचे सांगितले त्या अनुशंगना मोहोळ पोलिस ठाणेस भाग 5 गुरंन 523/2022 भादवि क . 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता या या गुन्ह्यातील तपास करत असताना यामध्ये आरोपी गुन्हयात निष्पन्न आरोपी 1 ) राजकुमार सिध्देश्वर सुळे वय 21 वर्ष रा आष्टी ता मोहोळ 2 ) अविनाश गोपाळ शिंदे वय 21 रा सुस्ते ता पंढरपुर त्यांच्याकडुन कोशल्यपुर्ण तपास करुन त्यांच्याकडून एकुण ४ जर्श्या गायी २ म्हैशी व 10 शेळ्या व एक मोटार सायकल व एक जीतो कंपनीचे टेम्पो असे एकुण 8,27,000 / - रूपयाचा जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस हेडकॉ . सचिन माने पोलीस नाईक अमोल घोळवे, पो ना प्रवीण साठे, महिला पोलीस नाईक अनुसया बंडगर, पोलीस कॉन्स्टेबल सिद्धनाथ मोरे व चालक हरिदास आदलिंगे या डीबी पथकाच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मतराव जाधव, पोलीस उपाधीक्षक अमोल भारती, पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी मोहोळ पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाचे अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment