२२ वर्षानंतर माजी विद्यार्थांचा स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 18, 2022

२२ वर्षानंतर माजी विद्यार्थांचा स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात साजरा

२२ वर्षानंतर माजी विद्यार्थांचा स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात साजरा

                थेऊर (कटुसत्य वृत्त):- चिंतामणी विद्या मंदिर थेऊर शाळेतील सन १९९९-२००० बँचच्या माजी विद्यार्थींनी आयोजित केलेला स्नेहसंमेलन व शिक्षक कृतज्ञता सोहळा रविवारी दि.१७ जुलै रोजी मॅजेस्टीक हॉटेल येथे मोठ्या थाटात पार पडला. यामध्ये सर्व आजी- माजी शिक्षकांचा गौरव करण्यात आला.

                या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मा.मुख्याध्यापक सोळवंडे सर होते. या अविस्मरणीय सोहळ्याला मुख्याध्यापक नेवाळे सर ,यांच्या सह पर्यवेक्षक खरात, काकडे,  गायकवाड , भरीत, सोळवंडे, महारनवर, अहिरे, बांगर, नजन , वाडकर  आणि सर्व आजी- माजी शिक्षक उपस्थित होते. 

                यावेळी शिक्षकांचा यथोचित सर्व शिक्षकांना शाल, श्रीफळ, पुस्तक, सन्मानपत्र , तुळशीचे रोप भेट देऊन गौरविण्यात आले. सोहळ्याची सुरुवात सर्वप्रथम विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेस दिप प्रज्वलन आणि अभिवादन करून आली.

                कार्यक्रमाचे प्रास्ताविक रहिमान शेख  यांनी केले. यानंतर शिक्षकांची ओळख, माजी विद्यार्थी तर्फे शिक्षकांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सर्व शिक्षकांनी आपापली मनोगते व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी पण आपले मनोगत व शाळेतील आठवणी व्यक्त केल्या. रहिमान शेख  यांनी मनोगत व्यक्त केले. यामध्ये शिक्षकांनी केलेल्या संस्कार, मदत, व  शिस्त यामुळे आज विद्यार्थी जीवनात यशस्वी झाले.

                शिक्षक मार्गदर्शनामध्ये जुन्या आठवणींना उजाळा दिला . अनेक विनोद सांगितले . भरभरून आशिर्वाद दिले . कार्यक्रम घेतल्या बद्दल आभार मानले. बहुसंख्य विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते. 

                प्रत्येक विद्यार्थ्यांनी बालपणातील शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला व झालेल्या चुकांबद्दल माफी ही मागितली . ज्यांना यश प्राप्त झाले त्यांनी आपल्या सर्व शिक्षकांमुळेच शक्य झाले त्याबद्दल मनापासून आभार मानून ऋ्ण व्यक्त केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी दिलेल्या सन्मानाबद्दल हिच आमची पावती व खरी संपत्ती असा गौरवोदगार केले. त्याचबरोबर सोनाली बांगर, श्रीनिवास वाघ, सुवर्णा कांबळे , संदिप धुमाळ , मंदार धुमाळ , भुषण नाईक, सतिश लगड, यांनी  मनोगत व्यक्त केले. तसेच माजी विद्यार्थी यांच्या कडून शाळेला फुल ना फुलाची पाकळी म्हणून छोटासा विकासनिधी शाळेला देण्यात यावा असे एकमताने ठरविण्यात आले.

                सर्व विद्यार्थ्यांनी ( ५१ हजार रुपये ) तर सतिश दिलीप लगडे यांनी कै. निखिल कोतवाल, कै. कांचन सर , यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ( ५० हजार रुपये ) असे एकुन १ लाख १ हजार रुपयांची मदत विद्यालया कडे सुर्फुत केली. यावेळी उपस्थितांना उत्तम भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या स्नेहसंमेलनाचे व कृतज्ञता सोहळाचे नियोजन सन २००० दहावीच्या बॅचने केले.

                "सन  २००० एसएससी ची बॅच आज आपण सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी गेट-टुगेदर स्नेह मेळावा आयोजित करून आम्हा सर्व शिक्षकांचा यथोचित सत्कार सन्मान केला तसेच शाळेविषयी असणारी तळमळ व निष्ठा यामुळे आम्ही सर्व शिक्षक भारावून गेलो पुन्हा एकदा इयत्ता दहावीचा वर्ग भरण्याचा अनुभव आम्हाला आला आपणा सर्वांना भावी आयुष्य सुखाचे समृद्धीचे आनंदाचे भरभराटीचे व आरोग्यमय जावो ही चिंतामणी चरणी प्रार्थना आपण केव्हाही कधीही आपल्या शाळेत या आपले सदैव स्वागतच आहे. सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद " - मुख्याध्यापक श्री बि. डि. नेवाळे सर, पर्यवेक्षक खरात सर

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages