शिवसेनेला धक्यावरधक्के अफवावर विश्वास ठेऊ नका - संजय राऊत
.jpg)
मुंबई, (नासिकेत पानसरे):- एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. आज एकाच दिवसात शिवसेनेला ५ मोठे धक्के बसले आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेची नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्याआधी एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या बैठकीला शिवसेनेचे १४ खासदार उपस्थित राहिल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकणातही शिवसेनेला दोन मोठे धक्के बसले. रामदास कदम यांनी नेतेपदाचा राजीनामा दिला, तर कोकणातच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनीही राजीनामा देत ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे.
शिवसेना शिंदे गटाची कार्यकारिणी
शिवसेना शिंदे गटाने शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त केली आहे. शिवसेना मुख्यनेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. आमदार दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड केली आहे. तर नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड करण्यात आली आहे. उपनेते म्हणून यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. हा सुद्धा शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान आज दिल्लीत शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रकार परीषद घेत १४ आमदार फुटल्याच्या अफवा असल्याचे सांगत शिवसेने सोबत ८।१० खासदार असल्याचे सांगितले.यावेळी त्यांनी त्या खासदारांची नावं जाहीर केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यनेते म्हणून त्यांच्या गटाची राष्ट्रीय कार्यकारणी जाहिर केली. याबाबत विचारता त्यांनी त्यांच्या बाबत विचारू नका.असे पत्रकारांना सांगितले.मात्र फुटीर गट राष्टीय कार्यकारणी कशी काय बरखास्त करू शकतात. त्यांना काय अधिकार असा सवाल त्यांनी यावेळी केला. मुळातच त्यांच्या फुटीरते बाबत सुप्रिम कोर्टात निर्णय प्रलंबित आहे. त्याकरीता त्यांचा खटाटोप चालू आहे. शिंदे गट अधिकृत आहे की नाही ह्याचा निर्णय अद्यापही झालेला नाही.
No comments:
Post a Comment