जिल्ह्यात 73 हजार 800 हजार हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 14, 2022

जिल्ह्यात 73 हजार 800 हजार हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या

जिल्ह्यात 73 हजार 800 हजार हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या

                पुणे, (कटुसत्य वृत्त): पुणे जिल्ह्यात खरीपाच्या सरासरी 1 लाख 95 हजार 710 हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत आजअखेर 73 हजार 808 हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली असून पेरणीचे प्रमाण सरासरीच्या 37 टक्के आहे अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.

                खरीप पेरणीसाठी आवश्यक बियाणे योग्य प्रमाणात उपलब्ध असून बाजरीचे सुमारे 2 हजार 600 क्विंटल, मका- 2 हजार 400, भात- 22 हजार, तूर- 130, वाटाणा- 600, भुईमूग- 450 क्विंटल तर सोयाबीनचे 3 हजार 600 क्विंटल बियाणे उपलब्ध आहे.

तालुकानिहाय झालेली पेरणी व कंसात सरासरी पेरणीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये) पुढीलप्रमाणे:

                हवेली- 821 हे. (4 हजार 906 हे.), मुळशी- 414 (8 हजार 545), भोर- 4 हजार 965 (17 हजार 465), मावळ- 534 (12 हजार 990), वेल्हे- 381 (5 हजार 892), जुन्नर- 11 हजार 931 (29 हजार 777), खेड- 15 हजार 921 (23 हजार 399), आंबेगाव- 7 हजार 606 (16 हजार 14), शिरुर- 12 हजार 236 (33 हजार 700),  बारामती- 8 हजार 274 (11 हजार 1), इंदापूर- 3 हजार 836 (8 हजार 414), दौण्ड- 1 हजार 935 (4 हजार 388), पुरंदर- 4 हजार 951 हे. (19 हजार 219 हे.) याप्रमाणे पेरणी झाली आहे.

                जिल्ह्यात सुमारे 69 हजार मे. टन खते उपलब्ध असून त्यामध्ये युरिया 25 हजार 900 मे. टन., डी.ए.पी.- 5 हजार 800 मे. टन, एम.ओ.पी.- 1 हजार 900 मे. टन, एस.एस.पी.- 9 हजार 700 मे. टन, तर विविध संयुक्त खते सुमारे 25 हजार 700 मे. टन उपलब्ध आहेत.

                जिल्ह्याच्या 830 मि.मी. या वार्षिक सरासरीच्या तुलनेत आजपर्यंत 394 मि.मी. (47 टक्के) पाऊस झाला आहे, अशी माहितीदेखील कृषी विभागाने दिली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages