प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप हंगाम 2022 ई - पीक पाहणी अंतर्गत पिकाची नोंद करण्याचे अवाहन करणेबाबत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 14, 2022

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप हंगाम 2022 ई - पीक पाहणी अंतर्गत पिकाची नोंद करण्याचे अवाहन करणेबाबत

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप हंगाम 2022 ई - पीक पाहणी अंतर्गत पिकाची नोंद करण्याचे अवाहन करणेबाबत

         सोलापूर, (कटुसत्य वृत्त):- खरीप हंगाम 2022 व रब्बी हंगाम 2022 – 23 हंगामासाठी राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकासाठी विमा क्षेत्र घटक धरुन राबविण्यात येत आहे. शेतक-यांनी घेतलेल्या पिका संदर्भात त्यांनी चालू हंगामात ई-पीक पाहणीमध्ये केलेली नोंद अंतिम ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व शेतक-यांनी आपल्या पिकांची नोंद वेळेत व बिनचुकपणे ई-पीक पाहणीमध्ये अॅपव्दारे करुन घेणे आवश्यक आहे. तसेच शेतक-यांनी शेतात पेरलेल्या पिकांचाच विमा घेणे आवश्यक आहे. विमा घेतलेले पीक शेतात पेरले नसल्यास शेतक-याचा विमा अर्ज बाद करण्यात येईल व त्याने भरलेली विमा रक्कम जप्त केली जाईल आणि त्याला नुकसान भरपाईचा कोणताही दावा मिळणार नाही. याची नोंद सोलापूर जिल्ह्यात सर्व शेतक-यांनी घ्यावी.

              या योजनेतील खरीप 2022 हंगामासाठी विमा हप्ता भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे. जिल्ह्यात खरीप हंगाम २०२२ मध्ये योजना भारतीय कृषी विमा कंपनी मुंबई क्षेत्रीय कार्यालय, स्टॉक एक्सचेंज टॉवर्स 20 वा, मजला दलाल स्ट्रीट फोर्ट मुंबई 400023, ई मेल pikvima@aicofindia.com, टोल फ्री. 18004195004 या विमा कंपनीकडुन राबविण्यात येत आहे.

             तरी सदर योजनेचा सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतक-यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages