लोकमंगल फाउंडेशन चा उपक्रम बेरोजगार उमेदवारांसाठी 14 रोजी रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन

सोलापूर (कटुसत्य वृत्त): कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, सोलापूर आणि लोकमंगल फाऊंडेशन व वर्कफोर्स सेंटर प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, 14 जुलै रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) विजापूर रोड या ठिकाणी सकाळी 10 वाजता सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यात 10 वी 12 वी, बी.एस.सी. केमेस्ट्री एम.एस.सी. केमेस्ट्री, आयटीआय ट्रेनी, फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, ईलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंटेशन, विमा प्रतिनिधी, डिप्लोमा, बी.ई. मेकॅनिकल अशा विविध प्रकारची रिक्तपदे उद्योजकांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर अधिसुचीत केलेली आहेत. नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी सदर संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ऑनलाईन ऍप्लाय करावे. मेळाव्यात सहभागी उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 14 रोजी घेण्यात येणार आहेत. इच्छुकांनी ऑनलाईन नोंदणी करून महाविद्यालयामध्ये मेळाव्याच्या दिवशी उपस्थित राहून सहभागी व्हावे. अडचण आल्यास कार्यालयाच्या 0217-2950956 या दूरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष भेटीद्वारे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थकोट, पार्क चौक, सोलापुर येथे संपर्क साधावा, असे अवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment