विद्यापीठाच्या परिक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) पध्दतीने घेण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे मागणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 16, 2022

विद्यापीठाच्या परिक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) पध्दतीने घेण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे मागणी

 विद्यापीठाच्या परिक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) पध्दतीने घेण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे मागणी



विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला परिक्षा पुढे ढकलण्यात येईल मा. कुलगुरु यांचे आश्वासन        

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कोरोनाच्या पार्श्वभुमीमध्ये विद्यार्थ्यांच्या निकालास उशिर होईल व विद्यार्थी इतर स्पर्धा परिक्षेला मुकु नये म्हणून MCQ परिक्षा झाल्यास लवकरात लवकर निकाल लागेल यासाठी उच्च न्यायालय, मुंबई येथे अपिल करण्यात आली होती. त्याचा निकाल दि. 01/05/2022 रोजी उच्च न्यायालयाने 13 अकृषी विद्यापीठात एकसामान परिक्षा पध्दत असावी असा निकाल दिला व यातील 3 अकृषी विद्यापीठे MCQ पध्दतीने परिक्षा घेत आहेत. परंतू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर हे ऑफलाईन लेखी घेण्यास उत्सुक आहे. सोलापूर विद्यापीठ व सर्व विद्यापीठामधील सर्वच कॉलेजमध्ये ऑनलाईन क्लासेस शिकविण्यात आले असून अभ्यासक्रम आजतागायत अपूर्ण आहे. मुंबई विद्यापीठ Traditional Courses, स्वायत्त संस्था यांच्या परिक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येत असतील तर इतर विद्यापीठाच्या परिक्षा ऑफलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहेत. तसेच जळगाव, नागपूर, नांदेड, गडचिरोली विद्यापीठ ऑफलाईन (MCQ) पध्दतीने परिक्षा घेणार आहे व इतर विद्यापीठ वेगळ्या पध्दतीने परिक्षा घेणार आहेत. सोलापूर शहर जिल्ह्यातील महाविद्यालयाचे सर्व फॅकल्टीचे बी.टेक (ऑल इंजेनियर), बी.सी.ए., एम.बी.ए., बी.एस.सी., एम.बी.ए., लॉ कॉलेज, आर्टस्, सायन्स, कॉमर्स इ. शाखेतील विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा पध्दत रद्द करून महाराष्ट्रातील इतर विद्यापीठाप्रमाणे घेतलेल्या निर्णयानुसार सोलापूर विद्यापीठाने देखील ऑफलाईन (MCQ) परीक्षा घ्यावी याबाबत विद्यार्थ्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना मागणी केली होती.
आमदार प्रणिती शिंदे यांनी तात्काळ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथील परिक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) पध्दतीने होण्यास्तव व तसेच याबाबतचा निर्णय होई पर्यंत परिक्षा पुढे यावे असे निवेदनाव्दारे मागणी केली. याबाबत मा. कुलगुरु यांनी सदरचा निर्णय होईपर्यंत परिक्षा पुढे ढकलण्यात येईल असे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले. यावेळी सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, सुशिक्षित बेरोजगार सेल अध्यक्ष रुपेश गायकवाड, अभिजित थोरात, कृष्णा बाबरे, संदिप क्षिरसागर, सुधीर खांडेकर, राज खांडेकर, सागर महिंद्रकर ऋषिकेश पिंगले, सागर महेंद्रकर व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. 


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages