कृषी महाविद्यालय आळणीच्या विध्यार्थ्यांचे माती परिक्षणावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 16, 2022

कृषी महाविद्यालय आळणीच्या विध्यार्थ्यांचे माती परिक्षणावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन

कृषी महाविद्यालय आळणीच्या विध्यार्थ्यांचे माती परिक्षणावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन

उस्मानाबाद (कटूसत्य वृत्त):- ग्रामीण जागरूकता आणि कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत कृषी महाविद्यालय आळणी(गडपाटी) उस्मानाबाद येथील चौथ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांनी कळंब तालुक्यातील मलकापूर येथे माती परीक्षण या विषयावर मार्गदर्शन केले.यावेळी मातीपरिक्षन केल्याने शेतकऱ्यांना होणाऱ्या फायद्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.मातीचा नमुना कसा घ्यायचा याचे प्रात्यक्षिक बालाजी लोमटे यांच्या शेतात करून दाखवले.यावेळी मृदाशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक एन. एस सुतार यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.एच पाटील,प्रा.दळवे सर,प्रा.शेटे सर,प्रा.बंडे सर,प्रा.भालेकर सर,प्रा.बुरगुटे सर तसेच विद्यार्थी विशाल चिखलकर,सुमित चव्हाण,तेजस चव्हाण,हरीश दाने,सुजित दराडे,अमोल अलापुरे,संदेश भुतेकर,रेवती चव्हाण,ऋतुजा बाबर,सोनाली बरगले उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages