चिकमहूद येथील नवीन शासकीय गोदामासाठी पाच कोटी रुपये मंजूर - आमदार शहाजीबापू पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 16, 2022

चिकमहूद येथील नवीन शासकीय गोदामासाठी पाच कोटी रुपये मंजूर - आमदार शहाजीबापू पाटील

 चिकमहूद येथील नवीन शासकीय गोदामासाठी पाच कोटी रुपये मंजूर- आमदार शहाजीबापू पाटील


सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला तालुक्यातील चिकमहुद येथे १०८० मेट्रिक टन क्षमतेचे नवीन शासकीय धान्य गोदाम बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग कडून पाच कोटी रुपयांच्या कामाला काल बुधवारी 15 जून रोजी प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
              सांगोला शहरात असलेल्या शासकीय गोदामात सुमारे ५०-६० वर्षे झाली असून हे गोदाम खूप जुनी झाले आहे.  त्यामुळे धान्यसाठा करण्यासाठी यामध्ये मर्यादा येत होत्या. म्हणून आमदार शहाजीबापू यांनी चिकमहुद येथे आटपाडी रोडवर असलेल्या ६ एकर शासकीय जागेमध्ये १०८० मेट्रिक टनाचे नवीन धान्य गोदाम बांधण्याची विनंती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा. छगन भुजबळ यांच्याकडे केली होती. याला मंत्री छगन भुजबळ यांनी त्वरित मान्यता देऊन सुमारे ५ कोटी रुपये अंदाजपत्रकाच्या या नवीन गोदामाला मंजुरी दिली आहे.
      या नवीन गोदामामुळे पंढरपूर, माळशिरस आटपाडी या तालुक्यासह सांगोला तालुक्यातील पश्चिम भागातील गावांमधील स्वस्त धान्य वितरण  दुकानांना धान्य पोहोचविणे सोयीचे होणार आहे. या नवीन धान्य गोदामामुळे तालुक्यात एक नवीन मोठी सोय झाली असल्याने याचा फायदा जनतेला होणार असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी अशी माहिती दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages