उधारीला कंटाळलेल्या माढ्यातील मोबाईल विक्रेत्याने वापरले पवार अस्र

दुकानात शरद पवार पंतप्रधान होत नाहीत तोपर्यंत उधारी बंद चा लिहला फलक
माढा (कटूसत्य वृत्त):-बाजारपेठेतील दुकाना मध्ये आज रोख रोख उद्या उधार असे बोर्ड व्यापार्याने लावलेले आपण निश्चितच पाहिले असतील.मात्र माढा शहरातील एका मोबाईल व्यावसायिकाने उधारीला बगल देण्यासाठी चक्क शरद पवारांचे अस्र वापरले आहे.बापुराव घुले असं त्या नामी शक्कल लढवलेल्या मोबाईल विक्रेत्याचे नाव आहे.
घुले यांनी दुकानातील काचेवर समोरच शरद पवार पंतप्रधान होत नाहीत.तोपर्यंत उधारी बंद असा फलकच लिहला आहे.त्यामुळे घुलेनी उधारीच्या कटकटीला कंटाळुन शरद पवारांचे अस्र वापरल्याने त्यांची व त्यांच्या दुकानाची चर्चा होत आहे.
हा फलक लावण्या मागे शरद पवारांविषयी वैयक्तिक काहीही नकारात्मक दृष्टीकोन माझा मुळीच नाही.अनेक जणांना उधार देऊन मला आर्थिक फटका बसला आहे.उधार न देण्याची शपथ घेऊन मी हा वेगळा फलक लिहला आहे.-बापुराव घुले व्यापारी माढा
0 Comments