Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोला येथे डाळिंब फळपिक समुह विकास कार्यक्रमाअंतर्गत शेतकरी मेळावा संपन्न......

 सांगोला येथे डाळिंब फळपिक समुह विकास कार्यक्रमाअंतर्गत शेतकरी मेळावा संपन्न......

        
सांगोला (कटूसत्य वृत्त):- आज बुधवार दिनांक २९ जुन २०२२ रोजी रामकृष्ण गार्डन, सांगोला  येथे राष्ट्रीय बागवानी बोर्ड ,कृषि व किसान कल्यान मंत्रालय भारत सरकार व महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ पुणे , कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांचे संयुक्त विद्यमाने डाळिंब फळपिक समुह विकास कार्यक्रम अंतर्गत शेतकरी मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन संचालक फलोत्पादन , कृषि आयुक्तालय पुणे श्री कैलास मोते यांचे हस्ते करण्यात आले.  यावेळी संचालक फलोत्पादन श्री कैलास मोते यांनी डाळिंब समुह विकास कार्यक्रमाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले व समुह विकास कार्यक्रमाध्ये सहभागी होऊन पायाभुत सुविधा निर्माण करण्याचे आवाहन केले. जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाअंतर्गत उच्च तंत्रज्ञान रोपवाटिका,टिश्यू कल्चर प्रयोगशाळा, औजारे बँक,माती व पान व देठ परिक्षण प्रयोगशाळा , पॕक हाऊस , शितगृह , प्रि कुलिंग युनिट , डाळिंब प्रक्रिया युनिट , एकात्मिक शितसाखळी , वातानुकुलित माल वाहतूक ,ब्रँडिंग , मार्केटिंग , निर्यात ईत्यादी सुविधा उभारणी केली जाणार असल्याचे संचालक यांनी सांगितले. त्याच बरोबर कषि विभागाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. 
यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि आधिकारी बाळासाहेब शिंदे , प्रभाकर चांदणे अध्यक्ष भारतिय डाळिंब उत्पादक संघ, आर के अग्रवाल उप संचालक राष्ट्रीय बागवानी बोर्ड पुणे, मोहित वर्मा  सदस्य कार्यक्रम व्यवस्थापण युनिट , ज्योसना शर्मा व डाॕ निलेश गायकवाड शास्त्रज्ञ राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापुर , महाजन व्यवस्थापक कृषि पणन मंडळ पुणे,निर्यातदार अमरजित जगताप व गुणवंत गरड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मदन मुकणे प्रकल्प संचालक आत्मा , डाॕ क्षिरसागर   कृषि विज्ञान केंद्र मोहोळ , आर.टि. मोरे कृषि उपसंचालक , माजी उपसभापती नारायन जगताप,माजी पंचायत समिती सदस्य सुभाष इंगोले , शिवाजीराव गायकवाड , उप विभागिय कृषि आधिकारी सर्जेराव तळेकर , रविंद्र कांबळे , तालुका कृषि आधिकारी शिवाजी शिंदे , शेतकरी उत्पादक कंपण्या , निविष्ठा कंपण्या , रोपवाटिकाधारक,बँकेचे प्रतिनिधी , कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी व डाळिंब उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments